शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: अहमदनगरमधील नगरसेवक द्विधा मनस्थितीत : कोणता झेंडा घेऊ हाती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 12:24 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या मतदारसंघात येणाऱ्या महापालिका व सात पालिका नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे़

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या मतदारसंघात येणाऱ्या महापालिका व सात पालिका नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे़ कोणता झेंडा घेऊ हाती, अशा द्विधा मनस्थितीत नगरसेवक आहेत़ त्यामुळे शहरी भागातील एक गठ्ठा मते पदरात पाडून घेण्यासाठी नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर आहे़लोकसभेची सर्वाधिक मते नगर शहरात आहेत़ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ़ विखे यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लक्ष घातले़ पण, या निवडणुकीत त्यांना फारसे यश आले नाही़ काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले़ काँग्रेस आघाडीविरोधात सेना-भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढविली़ सेनेचे २४, तर भाजपाचे १४ नगरसेवक निवडून आले़ या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली़ काँग्रेसचे डॉ़ विखे आता भाजपमध्ये आले आहेत़भाजप प्रवेशानंतर विखे यांनी महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या सेनेशी जवळीक साधली़ अर्थात सेनेची मते, हा त्यामागील हेतू आहे़ राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक निवडून आले़ त्यांनी सत्ता स्थापनेत भाजपाला साथ दिली़ पण, ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला, त्यांनाच आता राष्ट्रवादीकडून मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे विखे की जगताप, असा पेच सर्वच नगरसेवकांसमोर आहे़नगरपालिका नगरसेवकांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ पारनेर नगरपालिकेत सेनेचे सर्वाधिक ९ नगरसेवक आहेत़ मात्र या भागाचे नेतृत्व करणारे सेनेचे निलेश लंके आता राष्ट्रवादीत आले आहेत़ त्यामुळे या तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदललेली आहेत़ कर्जत नगरपालिकेत भाजपाचे सर्वाधिक १२ नगरसेवक आहेत़ काँग्रेसचे ४ , तर अपक्ष १ असे संख्याबळ आहे़ त्यामुळे कर्जत शहरात चमत्कार होईल, अशी स्थिती नाही़श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपाचे १३, राष्ट्रवादी २, काँग्रेस ४, असे संख्याबळ आहे़ या तालुक्यातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे़ या निर्णयावरही बरेच काही अवलंबून असणार आहे़ जामखेडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समीकरणे बदलली़ राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांनी कमळ हातामध्ये घेतले़ पण, दस्तुरखुद्द शरद पवारांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़ शेवगाव नगरपालिकेतही भाजपाचे १२, तर राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक आहेत़ राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १६, तर विखे-कर्डिले परिवर्तन आघाडीचे ६ नगरसेवक आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर