अहमदनगर : कर्जत शहरातील मुस्लिम ट्र्स्ट पीर दावल मलिक देवस्थान जमीनीवरील अनाधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी करणारे तौसिफ हमीम शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले. त्यांनी आत्मदहनाचा इशारा देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने दुर्घटना घडली.याबाबत अनाधिकृत बांधकाम हटविण्यासाठी शेख यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज शेख यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख यांनी अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये शेख मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्याने घेतले पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 16:54 IST