शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी आता दिल्लीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST

अहमदनगर : इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न सोडविण्यासाठी मी शांत न बसता प्रशासनाशी भांडेल. प्रसंगी आपण दिल्लीत जाऊ, मंत्रिमहोदायांशी चर्चा करू, ...

अहमदनगर : इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न सोडविण्यासाठी मी शांत न बसता प्रशासनाशी भांडेल. प्रसंगी आपण दिल्लीत जाऊ, मंत्रिमहोदायांशी चर्चा करू, त्यातूनही मार्ग निघाला नाही तर दिल्लीत आंदोलन करू. अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी, या माग‌णीसाठी विविध सामाजिक व प्रवासी संघटनांनी रेल्वे स्टेशनवर गांधीगिरी केली. याप्रसंगी जगताप बोलत होते.

आमदार संग्राम जगताप, जागरूक नागरिक मंचचे सुहास मुळे, प्रवासी संघटनेचे हरजितसिंग वाधवा, सामाजिक कार्यकर्ते कारभारी गवळी, अर्शद शेख, दत्ता गायकवाड, बहिरनाथ वाकळे, जालिंदर बोरुडे, कैलास दळवी, अशोक कानडे, प्रकाश कुलकर्णी, मन्सूर शेख आदींसह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाकडून रेल रोको आंदोलन करू नये, अशी विनंती आंदोलकांना करण्यात आली. प्रभारी स्टेशन मास्तर श्रीकांत परोडा व वाणिज्य निरीक्षक एस.एम. वेदपाठक यांनी नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेबाबत सर्व्हे करून काम सुरू करणार आहोत, असे लेखी आश्वासन यावेळी दिले.

आमदार जगताप म्हणाले, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी यासाठी विविध प्रवासी व सामाजिक संघटनांनी सुरू केलेले आंदोलन महत्त्वाचे आहे. पुण्याला जाण्याऱ्या सर्वसामान्यांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी अल्प दरात सोय होण्यासाठी ही रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. आता स्पीड लिमिट असल्याने वाहनेही फास्ट चालवली तर दंड होतो. आंदोलनाला मी पाठिंबा देत आहे.

सुहास मुळे म्हणाले, आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने जरी लेखी आश्वासन दिले असले तरी एक महिन्यात ही गाडी सुरू झाली नाही तर आम्ही दिल्लीत रेल्वे मंत्र्यांच्या दालनात धरणे आंदोलन करू. हरजितसिंग वधवा म्हणाले, नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही रेल्वे सुरू होणे अत्यावश्यक आहे. अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. अर्शद शेख म्हणाले, नगर शहराचा विकास थांबल्याने हे शहर आता निवृत्त नागरिकांचे शहर होत आहे. आमची सहनशीलता आता संपली आहे.

( १३ संग्राम जगताप)