शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पबजी गेम्समुळे मुलांचा स्वभाव होतोय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:36 IST

व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ काही नवीन नाही.

रामप्रसाद चांदघोडेघारगाव : व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ काही नवीन नाही. पोकेमॅन गो, ब्ल्यू व्हेलनंतर संगमनेर तालुक्यासह पठारभागात पबजी नावाच्या गेमने धुमाकूळ घातला आहे. या गेममुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील काळात काही गेम्समुळे तरुणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.पबजी हा अ‍ॅक्शनपॅड गेम असून हा खेळण्यात तरुण मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आॅनलाईन गेम असल्याने तसेच यात बोलणे आणि संदेश पाठविला जात असल्याने तरुणाईची या खेळाकडे चांगलीच ओढ लागली आहे. मुळात हा खेळ अठरा वर्षावरील मुलांसाठीच आहे. परंतु, कमी वयातील मुलेच जास्त खेळताना दिसत आहेत.पबजी हा खेळ ग्रुप करून खेळला जातो. यात चार तरुण ते शंभर तरुण आॅनलाईन एकत्र येऊन हा गेम खेळतात. या खेळाचा या तरुणांवर इतका विपरीत परिणाम झाला आहे की, व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटससुद्धा या पबजी गेमचे लावले जात आहेत. गेम समजत नसेल तर तासन्तास यू ट्यूबवर याचे व्हिडीओ पाहिले जातात.पबजी गेम खेळतेवेळी तरुणांना आलेले महत्त्वाचे कॉल देखील रिजेक्ट केले जात आहेत.हा गेम बंदुकीच्या साहाय्याने चोरांना मारणारा असल्याने या मारधाडीच्या खेळामुळे मुलांचा स्वभाव आक्रमक बनला आहे. त्यामुळे यावर अंकुश लावणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शालेय, महाविद्यालयाचा अभ्यास बाजूला सारत आपला पाल्य काय करतो? कुठे जातो? यात पालकांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.अशा गेम्समुळे तासन्तास मोबाईल डोळ्यांसमोर असल्याने डोळ्यांचे आजार होण्याचा धोका असतो. चिडचीड व मानसिक तणाव निर्माण होते. इतर आजारही बळावू शकतात. पालकांनी वेळीच आपल्या पाल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. -डॉ.राहुल आहेर, साईसिद्धी हॉस्पिटल, घारगाव, ता.संगमनेर.पबजीसारख्या गेम्स मुलांना बघण्याची सवय लागते. मुलांचे अभ्यासाकडे लक्ष कमी होते. मुलांवर मानसिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी वेळीच सजग होऊन मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. -डॉ.भाऊसाहेब डामसे, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, घारगाव, ता.संगमनेर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर