शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचे उर्वरित ३७ कोटी अखेर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:32 IST

बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले.

अहमदनगर : बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले. त्यामुळे शेतक-यांना दिवाळीच्या तोंडावर चांगलाच दिलासा मिळाला आहे. परंतु हे पैसे प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात कधी जमा होतात, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. या कपाशीचे पंचनामे करून नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडून १५७.२३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. हे अनुदान तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्त्यापोटी ८३ कोटी ७२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यातील ८३ कोटी ५१ लाख रूपयांचे वाटप शेतकºयांना करण्यात आले. (२० लाखांचे वाटप अद्याप बाकी) परंतु तरीही अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिल्याने जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्यासाठी ३७.६४ कोटी रूपयांची वाढीव मागणी २१ सप्टेंबर रोजी शासनाकडे कळवली होती.यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे या अनुदानाची वाट पाहत होते. अखेर दीड महिन्यानंतर उर्वरित ३७ कोटी ६४ लाख ३१ हजार ९९१ रूपयांचे बोंडअळीचे अनुदान शुक्रवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले आहे. आता येथून हे अनुदान संबंधित तहसीलकडे वर्ग होऊन तेथून थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दिवाळीच्या आधी हे अनुदान आले असले तरी प्रत्यक्षात दिवाळीला हे अनुदान शेतक-यांना मिळेल की दिवाळीनंतर, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.बोंडअळीच्या तिस-या टप्प्यातील ३७.६४ कोटी रकमेची मागणी शासनाकडे केली होती. अखेर हे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे जमा झालेले आहे. लवकरात लवकर संबंधित तहसीलकडे ही रक्कम वर्ग करून दिवाळीसाठी शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहील. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय