शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूबाबत ढकलाढकल, स्थानिक नेत्यांनीही सोडली जनतेवर जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:18 IST

अहमदनगर: नगर शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी होत असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हा निर्णय आता जनतेवरच सोडला आहे़ नगर शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी जाहीर केली़ 

अहमदनगर: नगर शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी होत असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हा निर्णय आता जनतेवरच सोडला आहे़ नगर शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी जाहीर केली़ 

नगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी पुढे आली आहे़ शहरातील विविध संघटनांनीही महापालिका आयुक्तांकडे तशी मागणी केली होती़ यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ हे काय निर्णय घेतात, याबाबत नगरकरांना उत्सुकता होती़ परंतु, पालकमंत्री मुश्रिफ यांनी जनता कर्फ्यूबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडली़ या बैठकीला आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते़ त्यांनीही पत्रकारांशी बोलताना आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत़ जनतेला जे हवे आहे, ते होईल़ शहरातील व्यापारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अन्य संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी दाखविली आहे़  शहरातील विविध घटकांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेऊनच पुढचा निर्णय होणार आहे़ राज्यातील काही शहरांत जनता कर्फ्यू लावण्यात आला़ परंतु, त्याचे पालन नागरिकांकडून होत नाही़ रस्त्यांवर गर्दी होतेच़ त्यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी होत नाही, असा अनुभव आहे़ ़़़शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, व्यापारी, विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल़- बाबासाहेब वाकळे, महापौऱ़़जनता कर्फ्यू लागू करण्यास विरोध नाही़ परंतु, जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी चर्चा करणे गरजेचे आहे़  सर्वांशी चर्चा करून याबाबाबत महापालिकेला कळविण्यात येईल़ -संग्राम जगताप, आमदार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या