अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच दोन हजारांच्या आत आली आहे. शनिवारी जिल्ह्यात केवळ १८५६ कोरोनाबाधित आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. नगर शहरातील रुग्णसंख्याही कमी झाली असून, १२६ इतकी झाली आहे.
मात्र दुसरीकडे २४ तासांत ९६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शनिवारी ३०४८ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २७ हजार ६०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.२७ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १८५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती १६ हजार ३१५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६९ आणि अँटिजन चाचणीत ८४७ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १, अकोले १, कोपरगाव १, नगर ग्रामीण ७, नेवासा २२, पारनेर १२, पाथर्डी ७, राहता ४, राहुरी १०, संगमनेर ५, शेवगाव १, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ४२ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ८४, अकोले १५९, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ४६, नेवासा २०, पारनेर ३१, पाथर्डी १६, राहाता ४६, राहुरी ९५, संगमनेर २५१, शेवगाव ९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ५९, कॅंटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज ८४७ जण बाधित आढळून आले. त्यात नगर शहर ४१, अकोले ४४, जामखेड २५, कर्जत ८३, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण ४२, नेवासा ५०, पारनेर ७३, पाथर्डी ९३, राहाता ३६, राहुरी ८०, संगमनेर ९८, शेवगाव ३७, श्रीगोंदा ४०, श्रीरामपूर ४७ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
---
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,२७,६०४
उपचार सुरू असलेले रुग्ण : १६,३१५
मृत्यू : २७४६
एकूण रुग्णसंख्या : २,४६,६६५