शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर कारागृहातील कैद्यांचे आरोग्य वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:33 IST

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जिल्हा कारागृहात १०९ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आरोग्य अधिका-यांचे पद जिल्हा आरोग्य संचालनालयाने भरले नसल्याने येथील कैद्यांची आरोग्य धोक्यात आले आहे.

नानासाहेब जठारविसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जिल्हा कारागृहात १०९ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आरोग्य अधिका-यांचे पद जिल्हा आरोग्य संचालनालयाने भरले नसल्याने येथील कैद्यांची आरोग्य धोक्यात आले आहे.विशेष म्हणजे विसापूर कारागृहाला २०१३ साली खुल्या कारागृहाचा दर्जा मिळाला. त्यापूर्वी कारागृहात काही वेळा दहा-बारा कैदी व पस्तीस कर्मचारी अशी अवस्था असताना पूर्णवेळ आरोग्य अधिका-यांची नेमणूक होती. त्यानंतर खुल्या कारागृहाचा दर्जा मिळाल्यानंतर दरम्यानचे काळात विसापूर कारागृह व भिक्षेकरीगृहांमध्ये संयुक्त आरोग्य अधिकारी नियुक्तीस होते. आता मात्र काही दिवसांपासून आरोग्य अधिक-यांची नियुक्तीच आरोग्य संचानालयाकडून झाली नाही. आरोग्य अधिकारी नसताना मात्र कारागृहात सरकारी औषधालय चालू आहे.त्या औषधालयात केमिस्ट व ड्रगीस्ट पदावर संतोष भोर हे कर्मचारी नियुक्त आहेत. ते व कारागृहातील हवलदार उदयभान खेडकर हे कैद्यांना प्रथमोपचार करतात. खेडकर यापूर्वी येरवडा कारागृहात असताना आरोग्य अधिक-यांचे मदतनीस म्हणून काम केल्याचे अनुभवाचा ते उपयोग करतात. एखाद्या कैदी गंभीर आजारी असल्यास त्याला नगरला जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. तरी ही बाब कैद्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक आहे. एखादा कैदी गंभीर आजारी पडला व त्याचेवर योग्यवेळेत रास्त प्रथमोपचार झाले नाही तर त्याचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे. कारागृह प्रशासनाने व जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य अधिकारी मिळावा यासाठी पाठपुरावा करुनही आरोग्य अधिकांयाची नियुक्ती होत नाही.

आठवड्यातून एकदा कैद्यांची आरोग्य तपासणी

कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की, कारागृहास स्वतंत्र आरोग्य आधिकारी नियुक्त गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. गाडे यांनी ही पाठपुरावा केला. परंतु आरोग्य संचालयाकडून अद्याप यापदाची नियुक्ती झाली नाही. आरोग्य विभागाने पिंपळगावपिसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बोठे यांना आठवड्यातून एका दिवशी एक तास कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. कारागृहास आरोग्य अधिकारी नसतानाही कैद्यांच्या आजारपणाबाबत योग्य काळजी घेण्यात येते. वेळप्रसंगी नगरचे जिल्हा रुग्णालयात रुग्ण कैदी पाठवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरjailतुरुंगShrigondaश्रीगोंदा