शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारानंतर जातपंचायतीने लावले जबरदस्तीने लग्न : तरुणीचा छळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 14:35 IST

ज्याने अत्याचार केला त्याच तरूणाशी तरूणीचे जबरदस्तीने जातपंचायतीने लग्न लावून दिल्याची घटना राहुरी येथे घडल्याचे समोर आले आहे.

राहुरी : ज्याने अत्याचार केला त्याच तरूणाशी तरूणीचे जबरदस्तीने जातपंचायतीने लग्न लावून दिल्याची घटना राहुरी येथे घडल्याचे समोर आले आहे. लग्नानंतरही सासरी छळ होत असल्याने अखेर तरूणी व तिच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आहे.राहुरी तालुक्यातील भटक्या समाजातील एका कुटुंबाच्या घरी काही दिवसांपूर्वी लग्न जमविण्यासाठी एक तरूण आला होता़ लग्न जमण्याआधीच त्या तरूणाने सदर तरूणीस शनिशिंगणापूर येथे लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला़ तसेच तरूणीचा आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ चित्रित केला़ ही व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या तरूणाने तरूणीशी लग्न करण्याची मागणी केली़ अखेर तालुक्यातील तांदूळवाडी येथे भटक्या जमातीची जातपंचायत भरवून तेथे सदर मुलीला त्याच तरूणाशी विवाह करण्यास भाग पाडले़ सदर मुलगी सासरी गेल्यानंतरही तिथे तिचा सासरच्या नातेवाईकांनी छळ सुरू केला़ या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित मुलीने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या दरम्यान कशीबशी त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत आपल्या आई वडिलांचे घर गाठले आणि सदर सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितली. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी सदर तरूणी व तिचे नातेवाईक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात हजर होते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस