शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षानंतर मढीत पोहोचले वांबोरी चारीचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 17:07 IST

अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. 

मढी : अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी शेतकºयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुष्काळी पश्चिम भागाला मुळा धरणातून चारीद्वारे पाणी मिळावे म्हणून गेल्या ४० वर्षापासून या भागात मोठी आंदोलने झाली. अनेकांना तुरुंगवास झाला. शासनाने याची दखल घेवून मुळा चारीचे रूपांतर बंद पाईपद्वारे या भागाला पाणी देण्यासाठी पाईप योजना केली. योजना पूर्ण होवून १० वर्ष झाली. मात्र या योजनेला ठेकेदाराने केलेले अपूर्ण काम, योजनेतील त्रुटी, अनाधिकृत कनेक्शन्स यामुळे पाणी आले नाही. मध्यंतरी योजनेच्या ट्रायलच्या दरम्यान एकदा मढी येथे पाणी पोहोचले होते मात्र ते तत्काळ बंद करण्यात आले होते. सलग दोन वर्ष या भागात दुष्काळ पडला. या प्रश्नावर दै. ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच या भागात जनजागृती झाली. पुन्हा वांबोरी चारीचे आंदोलन पेटले. प्रशासन व राज्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या अथक परिश्रमामुळे या योजनेच्या ‘टेल’ला असणाºया मढी गावच्या तलावात पाणी नेण्यात यश आले.मढी, घाटसिरस या भागातील फळबागा दुष्काळामुळे जळाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याचे संकट वाड्यावस्त्यांवर जाणवत असताना वांबोरी चारीच्या पाण्याने या भागातील शेतकºयांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ‘टेल’ला पाणी आल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असे शेतकरी भगवान मरकड, बबन मरकड यांनी सांगितले.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाAhmednagarअहमदनगर