शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

२५ दिवसांनंतर नेप्ती उपबाजार गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST

केडगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २५ दिवसांपासून बंद असणारा नगर बाजार समितीचा नेप्ती उपबाजार भाजीपाला व फळांच्या खरेदी-विक्रीने ...

केडगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २५ दिवसांपासून बंद असणारा नगर बाजार समितीचा नेप्ती उपबाजार भाजीपाला व फळांच्या खरेदी-विक्रीने गजबजून गेला. बुधवारी पहिल्याच दिवशी ३० टक्केच आवक झाली. कोरोनाच्या नियमांचे कडक पालन व्हावे यासाठी पोलीस बंदोबस्तात व्यवहार पार पडले.

नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे पासून नगर बाजार समितीमधील मुख्य बाजाराबरोबरच नेप्ती उपबाजार समितीत चालणारा फळे व भाजीपाला बाजार बंद केला होता. नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळेत भाजीपाला व फळे बाजार भरविण्यास परवानगी दिली. त्यासाठी काही अटी व शर्तींचे नियम घालून दिले. त्याची अंमलबजावणी करीत नगर बाजार समितीने आजपासून नेप्ती उपबाजार येथे फळे व भाजीपाला बाजार भरविण्यास सुरुवात केली.

मोठ्या कालखंडानंतर बाजार सुरू झाल्याने पहिल्या दिवशी फक्त ३० टक्के आवक होती. खरेदीदार व आडतदार यांनी नियमांचे कठोर पालन करावे यासाठी पोलीस बंदोबस्तात बाजार भरविला गेला. यासाठी प्रथम समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड चाचणी घेण्यात आली. आत येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान व ऑक्सिजन पातळी यांचीही तपासणी करण्यात आली. सकाळी २३३ क्विंटल इतक्या भाजीपाल्याची आवक झाली तर ३६ क्विंटल फळांची आवक झाली.

-----

भाजीपाल्याची आवक व दर असे..

(आवक आणि दर क्विंटलचा)

शेतमाल आवक दर

टोमॅटो ३३ ६००

वांगी ४ १०००

फ्लावर १२ २०००

कोबी ९ ६५०

दोडका ३ २५००

कारले ३ २५००

भेंडी ३ २५००

बटाटे ८६ ८५०

लसुण १४ ५५००

हिरवी मिरची १७ ३०००

भुईमूग ३ ३०००

लिंबू २ ३५००

अद्रक ९ १७००

गाजर ३ १२५०

भोपळा ३ ७५०

मेथी ७ ११००

कोथिंबीर १० ६५०

डांगर ३ ७५०

पालक ४ ६००

शेपू ३ ८००

-------

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे आजपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व त्यांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत भाजीपाला व फळांचा बाजार सुरू करण्यात आला. सामाजिक अंतर रहावे यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

-अभय भिसे,

सचिव, बाजार समिती, नगर

----

फोटो आहे