शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांनी अश्विनात आला अधिक महिना ; बाजाराची मरगळ हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:37 IST

अहमदनगर : अधिक मासाला शुक्रवार (दि. १८) पासून सुरूवात होत आहे. पितृपक्षाची गुरुवारी (दि. १७) सांगता झाल्याने गेल्या पंधरादिवसांपासून बाजारावर असलेली मरगळ हटणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अश्विन महिन्यात अधिक मास आल्यामुळे घटस्थापना, नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी एक महिना लांबणीवर पडली आहे.

अहमदनगर : अधिक मासाला शुक्रवार (दि. १८) पासून सुरूवात होत आहे. पितृपक्षाची गुरुवारी (दि. १७) सांगता झाल्याने गेल्या पंधरादिवसांपासून बाजारावर असलेली मरगळ हटणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अश्विन महिन्यात अधिक मास आल्यामुळे घटस्थापना, नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी एक महिना लांबणीवर पडली आहे.

दर तीन वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. दर १९ वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो, असा कालगणनेचा सर्वसाधारण नियम आहे. यापूर्वी २००१ मध्ये अश्विन महिन्यात अधिक मास आला होता, अशी माहिती पंचांगांत नमूद करण्यात आली आहे. यंदाचा अधिक मास हा अश्विन महिना आहे. तीन वर्षांनी येणारा अधिक मास हा श्रावण महिना असणार आहे.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असे १२ चांद्र मास आहेत. एका अमावस्येपासून दुसºया अमावस्येपर्यंत एक चांद्र मास असतो. मीन राशीत ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, त्यास चैत्र, मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, त्यास वैशाख मास म्हणतात. याप्रमाणे पुढील अनुक्रमाने पुढील चांद्र मास येतात. प्रत्येक चांद्र महिन्यात सूर्याचे राशीसंक्रमण झाले तर तो नेहमीचा चांद्र मास असतो. परंतु ज्या चांद्र मासात सूर्याचे राशीसंक्रमण होत नाही, त्या महिन्यास अधिक मास,मल मास, किंवा धोंडा मास म्हणतात, असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक महिन्याची एक देवता सांगितलेली आहे.  अधिक मासाची देवता भगवान श्रीकृष्ण असल्याने अधिक मासास ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते. ----घटस्थापना १७ आॅक्टोबरलापितृपक्षाची सांगता सर्वपित्री आमावस्येला होते. त्याच्या दुसºया दिवशी घटस्थापना होते. यंदा अधिक मास आल्याने घटस्थापना एक महिना लांबणीवर म्हणजे १७ आॅक्टोबरला होणार आहे, तर दसरा २५ आॅक्टोबरला आहे.  गतवर्षी दिवाळी २७ आॅक्टोबरपासून सुरू झाली होती, यंदा १४ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होणार आहे. ------अधिक मासात साखरपुडा, बारसे, डोहाळेजेवण, जावळ, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी, नवीन व्यवसायाचा आरंभ करता येतो. विवाह, वास्तुशांती असे कार्यक्रम मात्र या महिन्यात करता येत नाहीत. जी कर्मे करणे आवश्यक आहे, ती सर्व या महिन्यात करावीत.  अधिक महिना विष्णूचा महिना समजला जातो. जावयाला विष्णू स्वरूप मानले असल्याने जावयाला वाण देण्याची प्रथा आहे.-किशोर जोशी, अध्यक्ष, पुरोहित संघ---------- 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarketबाजार