शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नालंदा स्कूलमध्ये रंगणार एरोमॉडेलिंग कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST

अहमदनगर : विमानाचे कार्य नेमके कसे चालते, त्याचा शास्त्रीय आधार काय, अशा सर्व गोष्टींची मनोरंजनात्मक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी ...

अहमदनगर : विमानाचे कार्य नेमके कसे चालते, त्याचा शास्त्रीय आधार काय, अशा सर्व गोष्टींची मनोरंजनात्मक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी नालंदा सेंटर ऑफ लर्निंगमार्फत नगर-सोलापूर रोडवरील वाळूंज परिसरातील नालंदा स्कूलमध्ये ७ फेब्रुवारीला एरो मॉडेलिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तिसरी ते आठवीच्या वर्गामधील सर्व शाळांतील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली मटेरियल वापरून प्रत्यक्ष विमान बनविण्याचे प्रात्यक्षिक मुलांना करता येणार आहे. तसेच या कार्यशाळेनिमित्त सर्वांना निसर्गाच्या सान्निध्यात वन भोजनाचाही आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती नालंदा स्कूलचे प्रशासकीय अधिकारी गौतम बहादुर्गे यांनी दिली.

कर्नल यशवंत बहादुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देणार्‍या नालंदा स्कूलमध्ये दरवर्षी वैशिष्ट्‌यपूर्ण उपक्रम राबविले जातात. मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून एरोमॉडेलिंग कार्यशाळेचा अभिनव उपक्रम घेण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ काळे हे विद्यार्थ्यांना एरोप्लेन मॉडेल तयार करण्यास शिकविणार आहेत. विद्यार्थ्यांना यात फिजिकल किट पुरविण्यात येणार आहे. याशिवाय देशाच्या हवाई दलाच्या सेवेत असलेल्या फायटर प्लेनच्या मिनी मॉडेलची प्रात्यक्षिकेही पहायला मिळणार आहेत. सुखोई, राफाएल, या फायटर प्लेनच्या छोट्या मॉडेलव्दारे त्यांच्या चित्तथरारक हवाई कसरतील यावेळी सादर करण्यात येतील, अशी माहिती प्राचार्या हेदर डिसुजा यांनी दिली. नोंदणीसाठी ३ फेब्रुवारी ही अंतिम तारीख असून नोंदणीसाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वा. प्र.)