शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत शाळा स्पर्धेत राज्यात नगर प्रथम

By admin | Updated: April 26, 2016 23:26 IST

अहमदनगर : शासनाने शैक्षणिक गुणवत्तेच्या घेतलेल्या प्रगत शाळा स्पर्धेत नगर जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावून राज्यात पहिल्या क्र मांकावर स्थान मिळवले आहे.

अहमदनगर : शासनाने शैक्षणिक गुणवत्तेच्या घेतलेल्या प्रगत शाळा स्पर्धेत नगर जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावून राज्यात पहिल्या क्र मांकावर स्थान मिळवले आहे. जिल्ह्यातील १ हजार ३५५ शाळा प्रगत झाल्या असून अकोले आणि जामखेडसारख्या मागास तालुक्यातील शाळांनी या उपक्रमात आघाडी घेतली आहे. २२ जून रोजी शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला आहे. यानंतर राज्यात शैक्षणिक गुणवत्तेची चळवळच सुरू झाली. यात २३ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान प्रगत शाळा उपक्रम हाती घेण्यात आला. यापूर्वी शासनाने शाळांच्या भौतिक व गुणवत्तावाढीसाठी केलेल्या कामाची प्रगती तपासण्यासाठी ‘प्रगत शाळा’ परीक्षा घेतली. २५ निकषांच्या आधारावर शाळेला ८० गुण मिळाल्यास व संकलीत दोनच्या चाचणीत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला कि मान ४० टक्के गुण प्राप्त झाल्यास ती शाळा २०१५-१६ करिता प्रगत म्हणून घोषित करण्यात आली. यात राज्यातील १३ हजार ९४२ शाळा प्रगत शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्हा १ हजार ३५५ शाळांसह पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असून येथील १ हजार ३१८ शाळा प्रगत आहेत. जिल्ह्यात ३ हजार ६०६ प्राथमिक शाळा आहेत. यातील १ हजार ३५५ शाळा प्रगत झाल्या आहेत. हा आकडा १५ एप्रिलपर्यंतचा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक प्रगती योग्य दिशेने सुरू आहे. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, गुलाब सय्यद यांच्या मार्गदर्शनाने अकोले, जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यात शंभरहून अधिक शाळा प्रगत आहेत. श्रीरामपूर, पारनेर आणि कोपरगाव तालुक्यांची घोडदौड सुरू आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रगत शाळांची कामगिरी चांगली आहे. लवकर या शाळांना भेटी देवून तेथील प्रगती समजावून घेणार आहे. भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अधिकाधिक उपक्रम राबवून त्या प्रगतीशील करण्यात येणार आहेत. -शैलेश नवाल,मुख्य कार्यकारी अधिकारी.