अहमदनगर : एखादी परीक्षा झाली अन् निकाल लागला म्हणजे सर्व सार्थकी लागले असे होत नाही. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना ‘अॅडमिशन’च्या अग्निदिव्यातून जावे लागते. दहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. काही अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे तर काहींची सुरू होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला ‘मिशन अॅडमिशन’वर ही एक नजर.‘मिशन अभियांत्रिकी’ सुरुराज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून २३ जूनपासून याला प्रारंभ झाला. राज्यभरातील शासकीय व सरकारी महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ जुलै आहे. एआरसी केंद्रावर झुंबड पालकांचे मिशन अॅडमिशनयंदा दहावीच्या निकालाने उच्चांक गाठला आहे़ त्यामुळे सर्वच महाविद्यालयांत प्रवेशासाठी गर्दी झाली आहे़ परंतु महाविद्यालयांची क्षमता कमी असल्याने गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जाणार आहेत़ गुणवत्ता यादीव्दारे प्रवेश मिळतो की नाही, याची चिंता पालकांना लागली आहे़त्यामुळे पालकांनीच प्रवेश मोहीम हाती घेतल्याचे दिसते़मुलीचा प्रवेश झाला आहे़ मात्र मुलाच्या प्रवेशाला अडचण येत आहे़मुलाला दहावीत ८१ टक्के गुण असूनही प्रवेश मिळेल,याची खात्री नाही़ हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी मुलांनी आणखी किती गुण मिळवायचे,एवढे गुण मिळूनही प्रवेश मिळत नाही़- डी़ एस़ काळे, पालक मुलीचे अॅडमिशन घ्यायचे आहे़सकाळी चार वाजता घरून निघालो़ सकाळी ११ वाजता इथे आलो़ परंतु त्यापूर्वीच प्रवेशासाठी मुलींच्या रांगा लागल्या आहेत़ सायंकाळचे पाच वाजले तरी अजून प्रवेश मिळाला नाही़ मुलगी सकाळपासून रांगेत उभी आहे़- राजेंद्र घनवट, पालकविद्यार्थ्यांची गैरसोयप्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने महाविद्यालयात येत आहेत. त्यांना महाविद्यालयाकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत आहे. अभियांत्रिकीचे वेळापत्रकआॅनलाईन अर्ज दाखल करणे २३ जून ते ३ जुलैकागदपत्रांची पडताळणी २३ जून-३ जुलैतात्पुरती गुणवत्ता यादी ५ जुलैअंतिम गुणवत्ता यादी ९ जुलैप्रमुख तारखाअभियांत्रिकी २३ जून ते ३ जुलैपॉलिटेक्निक २७ जून ते ६ जुलैअकरावी १९ जून ते १९ जुलै
अ...‘अॅडमिशन’चा!
By admin | Updated: June 24, 2014 00:06 IST