शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: October 8, 2023 08:36 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि.१६) होत आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

 अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि.१६) होत आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यासाठी कडेकोट बंदोबस्तही लावला आहे. एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होईल. प्रत्येक फेरीनंतर निवडणूक आयोगाला त्याची माहिती दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली. मतमोजणीच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. यावेळी अतिरिक्ति जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे व निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी आदी उपस्थित होते. मतमोजणी ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय होईल. ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल लावले जातील. पोस्टल बॅलेटच्या मोजणीसाठी स्वतंत्र रचना आहे. त्यात ५०० मतपत्रिकांसाठी १ टेबल लावला जाईल. नगरसाठी ४ तर शिर्डीसाठी ३ टेबल लावले आहेत. प्रत्येक उमेदवारास पोस्टल बॅलेटच्या १ टेबलासाठी १ प्रतिनिधी नियुक्त करता येईल. नगरसाठी १ हजार ८७६ तर शिर्डीसाठी ६९७ मते पोस्टाद्वारे आली आहेत. मतमोजणीस १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसच प्रतिनिधी नेमता येईल. प्रत्येक टेबलसाठी १ पर्यवेक्षक, १ सहायक, १ सूक्ष्म निरीक्षक व शिपाई अशी व्यवस्था आहे. इतर दोन सूक्ष्म निरीक्षक सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. केंद्रीय निरीक्षकही उपस्थित राहतील. मतमोजणीस नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना ओळखपत्र दिले आहेत. त्यांनी त्यावर स्वाक्षरी करावी. त्यांना टेबल सोडून इतरत्र फिरण्यास मनाई केली आहे. त्यांना सकाळी ७ वाजता मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहावे लागेल. (प्रतिनिधी) मोबाईलला बंदी मतमोजणी केंद्रात उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी तसेच गणना प्रतिनिधीला भ्रमणध्वनी नेण्यास बंदी करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांसाठीही हा नियम आहे. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना मात्र, यातून सवलत देण्यात आली आहे. मीडिया प्रतिनिधींसाठी प्रवेशपत्र दिले आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षही केला आहे. १०० मीटरच्या आत गाड्या आणण्यास मनाई केली आहे. निवडणूक खर्च मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर व निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीचा निवडणुकीसंबंधातील खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्टार कॅम्पेनर-उमेदवारांनी मतदारसंघास भेट दिल्यास (मतमोजणी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी) झालेला खर्च ग्राह्य धरला जाईल.