शुक्रवारी जनसेवा फाऊंडेशनचे जालिंदर लबडे व राहाता पंचायत समितीचे सदस्य काळू रजपूत, संतोष ब्राह्मणे यांनी भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यासमवेत बैठक घेतली.
गावातील सरकारी कार्यालयात पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत गावातील वाॅर्डनुसार कोणत्या कामाची गरज आहे, यावर संभाषण होऊन बाकी असलेली कामे तत्काळ करण्यात यावीत. अशा कामांची नोंदणी करून यादी तयार करण्यात आली. कामांची यादी आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. गावातील आरोग्यसेवा केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, तलाठी कार्यालय येथे देखील पाहणी करून कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी सरपंच पूनम बर्डे, उपसरपंच अशोक लहामगे, ग्रामसेवक देवेंद्र वारुळे भीमराज शेळके, संजय शेळके, सुरेखा शेळके, प्रवीण शेळके, सुनील बर्डे, पशुवैद्यकीय अधिकारी निधाने, आरोग्यसेविका गोसावी, तलाठी शिरसाठ, तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
...........
गावात ग्रामस्थांची खोळंबलेली कामे सोडवली जात आहेत. आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मोठ्या सहकार्यामुळे गावाला एक मोठे वळण मिळत आहे. गावाच्या अधिक विकासासाठीची कामे बैठकीत मांडली. गावाचा विकास करण्याचे ध्येय आहे.
- पूनम बर्डे, सरपंच, आडगाव बुद्रुक. ता. राहाता
-----०५ अस्तगाव