शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

काश्मिरमध्ये राबविणार आदर्शगाव योजना : सरहद संस्थेचा पुढाकार

By साहेबराव नरसाळे | Updated: November 15, 2018 12:34 IST

साहेबराव नरसाळे अहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी ...

साहेबराव नरसाळेअहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी काश्मिरमधील तरुणांच्या टीमने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शगाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.काश्मिरमधील अनंतनाग, कुपवाडा, बारामुला या जिल्ह्यात आदर्श गाव योजना राबविण्याबाबत ५० संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे सर्व्हे सुरु करण्यात आला आहे़ सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी काश्मिरमधील तरुणांची हजारे व पवार यांची भेट घडवून आणली़ बुधवारी या टीमने राळेगणसिद्धी व हिवरेबाजारमधील कामांची पाहणी केली़ गाव विकासात लोकसहभाग कसा वाढविता येईल, याबाबत हजारे व पवार यांच्याशी चर्चा केली़ या टीममध्ये जाहीद भट, ओवैसी वाणी, फिराज खान, इलियास खान, तुफेल भट, मुस्ताक ख्वाजा यांचा समावेश आहे़ ही सर्व टीम सरहद संस्थेअंतर्गत काश्मिरमधील विविध प्रश्नांवर काम करीत आहे.अण्णा हजारे जाणार काश्मिरलाकाश्मिरमध्ये दूध उत्पादन, गाव विकासासाठी कोणत्या योजना राबविण्यात येतील, याबाबत तरुणांनी हजारे यांच्याशी चर्चा केली़ ‘काश्मिरमध्ये लोकसहभागातून काम करण्यास मोठा वाव आहे़ तुम्ही गावांची निवड करुन कळवा़ मी येतो,’ असे आश्वासन हजारे यांनी दिल्याची माहिती भट यांनी दिली़यापूर्वीही झाला होता प्रयत्ननोव्हेंबर २००० साली सरहद संस्थेने काश्मिरमध्ये आदर्शगाव योजना राबविण्याबाबत पुढाकार घेतला होता़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काश्मिरमध्ये बैठकाही घेतल्या होत्या़ अनेक संस्था एकत्र येऊन काम करीत होत्या़ मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडले होते.पुढील आठवड्यात बैठकलोकांमध्ये एकात्मता निर्माण करुन मातीशी जोडलेल्या माणसांना एकत्र केल्यास काश्मिरमध्येही आदर्श गाव योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे पोपटराव पवार यांनी काश्मिरमधील तरुणांना आश्वासित केले़ पुढील आठवड्यात गाव विकासाच्या मुद्यावर एकत्र येणाऱ्यांची बैठक घेऊन तेथील टीम पुन्हा राळेगणसिद्धी व हिवरेबाजारला आणणार असल्याचे भट यांनी सांगितले़युवकांना सोबत घेऊन पूर्वीच्याच गाव विकासाच्या आराखड्याला मूर्त स्वरुप देण्याचे नियोजन सुरु आहे़ लोकसहभागातून आदर्श गाव योजना काश्मिरमध्ये राबविण्याबाबत अण्णा हजारे व पोपटराव पवार यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. -संजय नहार, संस्थापक अध्यक्ष, सरहद संस्था, पुणे

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर