शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकावर होणार कारवाई

By admin | Updated: August 10, 2023 11:45 IST

बदली टाळण्यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कोपरगाव तालुक्यातील एका शिक्षकाने अपंगत्व प्रमाणपत्रात खाडाखोड करत, अपंगत्वाची टक्केवारी वाढविली असल्याचे उघड झाले आहे.

अहमदनगर : बदली टाळण्यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कोपरगाव तालुक्यातील एका शिक्षकाने अपंगत्व प्रमाणपत्रात खाडाखोड करत, अपंगत्वाची टक्केवारी वाढविली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी रुबल अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतांना अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत अधिक माहिती अशी कोपरगाव तालुक्यातील चंद्रकांत माळी या शिक्षकाने आपल्या अपंगत्वाच्या प्रमाणात खाडाखोड केलेली आहे. त्याच्याकडे ३० टक्के अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र होते. त्यात त्याने खाडाखोड करत ४० टक्के अपंगत्व करून घेतले. विशेष म्हणजे त्याने २००५ ते २००९ या कालावधीत त्या प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेला आहे. ही बाब कोपरगावचे गटशिक्षणाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शिक्षणाधिकार्‍यांना संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शिक्षणाधिकारी गोविंद आणि त्यांचे सहकारी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेलेही. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.सदर प्रकरण हे कोपरगाव येथील असल्याने गुन्हा देखील कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे कोतवाली पोलिसांनी सुचविले आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्रस्ताव पाठविला असून त्यांची मान्यता मिळताच संबधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) चौैकशी पूर्ण बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणार्‍या शिक्षकांपैकी १६ प्राथमिक शिक्षकांची चौकशी पूर्ण झालेली आहे. या शिक्षकावर येत्या आठवड्यात प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकांवर सौम्य स्वरूपात कारवाई करावी यासाठी राजकीय दबाब वाढत आहे. सोमवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एक विद्यमान उमेदवाराने मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची भेट घेवून शिक्षकावरील कारवाई टाळण्याची मागणी केली आहे. काही जिल्हा परिषद सदस्य अशी मागणी करत आहेत. राजकीय दबावाच्या वृत्ताला नवाल यांनी दुजोरा दिला आहे.