शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

शाखा अभियंत्यावर होणार कारवाई

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

अहमदनगर : शेवगाव, पाथर्डी योजनेत कामात हलगर्जीपणा करणारे शाखा अभियंता बबन खोसे यांचा कार्यभार काढण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अहमदनगर : शेवगाव, पाथर्डी योजनेत कामात हलगर्जीपणा करणारे शाखा अभियंता बबन खोसे यांचा कार्यभार काढण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जलस्वराज्य टप्पा क्र . २ योजना नगर आणि पाथर्डी तालुक्यात वांबोरी चारीच्या कार्यक्षेत्रात राबविण्याची मागणी सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केली. ही मागणी मान्य करण्यात आली.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. सुरूवातीला जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर बुऱ्हाणनगर आणि ४४ गावे, मिरी- तिसगाव व २२ गावे, गळनिंब- शिरसगाव व १८ गावे, चांदा व ५ गावे या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील गावांच्या पाणी साठवण उंच टाकीजवळ वॉटर मीटर बसविण्यात येणार आहे. यासाठी ५५ लाख ६० हजार रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.जलस्वराज्य योजनेत मोठा निधी उपलब्ध आहे. या योजनेत ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गाव अथवा वाडीवस्ती आणि त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असल्यास ४० लाख रुपयांपर्यंत पाणी साठवण बंधारा बांधता येणार आहे. ही योजना वांबोरी चारीवर नगर आणि पाथर्डी तालुक्यात राबविण्याची सूचना सदस्य पाटील यांनी मांडली. त्यास समितीने मान्यता दिली.जिल्ह्यात असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजना येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाला देण्यात आल्या. जिल्ह्यात संभाव्य दुष्काळा बाबत चर्चा झाली. यात जनावरांना चारा आणि छावण्या सुरू करण्याबाबत काही सदस्यांकडून सूचना करण्यात आल्या.शेवगाव, पाथर्डी पाणी योजनेच्या कामात कुचराई करणारे, योजना असणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात शुध्द पाणी देऊ न शकणारे शाखा अभियंता यांच्याबाबत बैठकीत चर्चा झाली. खोले यांच्या तक्रारींची दखल घेत त्यांच्याकडील कार्यभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीला उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, हर्षदा काकडे, शाहूराव घुटे, बाबासाहेब तांबे, सदस्य पाटील, सुदाम पवार, कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)