शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात चार जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 17:54 IST

तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी परिसरातील एका घरात चार चोरट्यांनी चोरी करीत एका पुरूषाला मारहाण केली होती. चोरी करून डोंगराआड लपून बसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

संगमनेर : तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी परिसरातील एका घरात चार चोरट्यांनी चोरी करीत एका पुरूषाला मारहाण केली होती. चोरी करून डोंगराआड लपून बसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चोरीची घटना २५ डिसेंबर २०१७ रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली होती. या चारही चोरट्यांविरोधात शुक्रवारी (२ मार्च) महाराष्ट संघटीत गुन्हेगारी कायदान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या कायदान्वये तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी सांगितले.संतोष शिवाजी जाधव (वय २६, रा. आभाळवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर), संदेश दत्तू धांडे (वय ३०, रा. कोंडेगव्हाण, ता. श्रींगोदा, जि. अ. नगर), चंदर दादाभाऊ गाडे (वय २९, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अ. नगर ), शरद बन्सी निचीत (वय २१, रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे) अशी चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेले भाऊसाहेब भिमाजी जाधव (मुंजेवाडी, अकलापूर, ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.अकलापूर, मुंजेवाडी परिसरातील मुगदरा येथे भाऊसाहेब जाधव यांच्या घरात चोरट्यांनी चोरी करीत त्यांना मारहाण केली होती. चोरी करून डोंगरावर लपून बसलेल्या या चारही चोरट्यांना मंगळवारी २६ डिसेंबर २०१७ रोजी ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चोरट्यांकडून पोलिसांनी एअरगन, तलवार, कोयता ही हत्यारे व मिरचीपूड जप्त केली होती. या गुन्हाबरोबरच इतर अनेक चोरीच्या गुन्ह्यांतही त्यांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले. या नंतर या चारही जणांविरोधात महाराष्टÑ संघटीत गुन्हेगारी कायदान्वये कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याकडे सादर करण्यात आला. यावर त्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर