शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन गुन्हे असलेल्या वाळूतस्करांवर होणार ‘एमपीडीए’ ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:37 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाळूतस्करांविरोधात चांगलाच फास आवळला आहे़ दोन गुन्हे दाखल असलेल्या तस्करांविरोधात एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सिंधू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत़

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाळूतस्करांविरोधात चांगलाच फास आवळला आहे़ दोन गुन्हे दाखल असलेल्या तस्करांविरोधात एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सिंधू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत़गेल्या साडेतीन महिन्यात पोलिसांनी जिल्ह्यात विविध तालुक्यांत २११ ठिकाणी छापे टाकून ३०० पेक्षा जास्त वाळूतस्करांवर गुन्हे दाखल केले आहेत़ या आरोपींना न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा वाळूतस्करीत सक्रिय होतात़ त्यामुळे प्रश्न जैसे थे च राहतो़ एमपीडीए अंतर्गत कारवाई केली तर आरोपीला एक वर्ष तुरुंगात स्थानबद्ध केले जाते.

वाळूतस्करांवर कायद्याचा धाक निर्माण व्हावा, यासाठी गुन्ह्यांचे स्वरुप पाहून एमपीडीए, मोक्का व इतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे़ पोलिसांनी अवैध वाळूउपशाविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत़गुन्हेगारांविरोधात मोक्का अथवा एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करताना काही त्रुटी राहिल्या तर याचा आरोपींना फायदा होतो़ त्यामुळे असे प्रस्ताव अचूक तयार करुन गुन्हेगारांवर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकारी व असे प्रस्ताव तयार करणारे दुय्यम अधिकारी, कर्मचारी यांना नगर येथे एक दिवसाचे प्रशिक्षण दिले़महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायदा करण्यात आला. यात आरोपीला एका वर्षासाठी स्थानबध्द (तुरूंगवास) करण्यात येते. याविरोधात केवळ उच्च न्यायालय व मंत्रालयात दाद मागता येते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस