शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खैरी प्रकल्पातून वाळू उपसा करण्यांवर कारवाई : ४३ लाखाचा मुद्देमाल जप्त, ११ अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:08 IST

वाकी परीसरातील खैरी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करणा-या पंधरा वाळूतस्करांवर कारवाई करण्यात आली. वाळूने भरलेले आठ ट्रक्टर जप्त केले असून ४३ लाख ७० हजार किंमतीचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

जामखेड : वाकी परीसरातील खैरी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करणा-या पंधरा वाळूतस्करांवर कारवाई करण्यात आली. वाळूने भरलेले आठ ट्रक्टर जप्त केले असून ४३ लाख ७० हजार किंमतीचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी अकरा आरोपी ताब्यात घेतले असून चार फरार झाले आहेत. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, विशाल दळवी, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन अढवळ, राहूल साळुंके, विनोद मासाळकर, संभाजी कोतकर, बबन बेरड यांच्या पथकाने आज दुपारी साडेबारा वाजता वाकी परिसरातील खैरी प्रकल्पाला चारही बाजूने वेढा दिला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक तासभर पोलीसांना आरोपी पकडण्यासाठी साठी वेळ गेला.     तुकाराम गोपाळघरे (नागोबाची वाडी), गणेश सतिष जगताप, नितीन जगताप, दत्ता शामराव डोके (खर्डा), सुरज भागवत भुते, सोमेश्वर सोरटे, महेश घोडके, रावसाहेब सुरवसे, विजय जगन्नाथ सावंत, नंदकुमार जगन्नाथ सावंत, भिमराव प्रल्हाद गोपाळघरे यांना अटक करण्यात आली. भानुदास प्रल्हाद गोपाळघरे, राम विठ्ठल भोसले, नामदेव बाबासाहेब जोरे, मदन पांडुरंग गोलेकर हे पळून गेले. याबाबत पोलीस नाईक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संदीप चव्हाण यांनी फिर्र्याद दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर