शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल

By रोहित टेके | Updated: May 23, 2023 13:12 IST

या  खटल्यात मुख्य आरोपीच्यावतीने अॅड शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले.

कोपरगाव (जि. अहमदनगर ) : राहाता तालुक्यातील साकुरी येथील हॉटेल बांबु हाउसवार झालेल्या दरोडा प्रकरणात आरोपींवर लागलेला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) गुन्हयातुन आरोपीची कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिपक आंबादास पोकळे(रा. साकुरी ता. राहाता जि. अहमदनगर)असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव आहे. या  खटल्यात मुख्य आरोपीच्यावतीने अॅड शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले.

  राहाता तालुक्यातील साकुरी येथील दिपक आंबादास पोकळे याचेविरुद्ध १९ नोव्हेंबर २०१७ रोजी राहाता पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी करुन दोषारोपत्र दाखल केले त्याप्रमाणे कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर मोक्का खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे १८ महत्वपूर्व साक्षीदार तपासण्यात आले. परंतु एवढया मोठा खटल्यात सरकार पक्ष कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा शाबीत करु शकले नाही.

कोपरगाव येथील जिल्हा वसत्र न्यायलयासमोर अॅड. शंतनु धोर्डे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिले की, आरोपी दिपक पोकळे याने वरील कलमांतर्गत कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच जवळ शस्त्र बाळगुन दरोडा टाकलेला नाही. फिर्यादीने फिर्यादीमध्ये दिलेले मुद्दे व कलम १६४ अंतर्गत दिलेले जबाब यात ब-याच प्रमाणात तफावत आढळत असल्याचे कोर्टाच्या लक्षात आणुन दिले. तर सरकारी पक्षाच्या कोर्टापुढील पुराव्यात व जबाबात व फिर्यादीत मोठया प्रमाणात विसंगती आढळुन आली आहे. ओळख परेड ही झालेली नाही या सर्व प्रकरणात फिर्यादीच्या सांगण्यानुसार तसेच दिलेल्या साक्षीदारांच्या जबाबानुसार घडलेली नाही. घटनास्थळ पंचनामा हा कसा चुकीचा असल्याच्या बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिल्या.

आरोपींनी बाळगलेले हत्यार त्याच्यापासुन केलेली जप्ती यामध्ये विसंगती कोर्टाच्या लक्षात आणुन दिली. तसेच आरोपींनी संघटीत गुन्हेगारीतुन कोणत्याही प्रकारची स्थावर व जंगम मिळकत मिळविलेली नाही. तसेच घटनेतील मुख्य आरोपी हा घटनास्थळावर नव्हता. त्याने कोणतेही प्रकारचे फिर्यादीप्रमाणे कृत्य केलेले नाही. त्याचा सदर घटनेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग नव्हता. हे अॅड. शंतनु धोर्डे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.