गणेश विठ्ठल आव्हाड (वय २३ रा. नवनागापूर) व सलीम शौकत सय्यद (वय २३ रा. एमआयडीसी, नगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी देवगड फाटा येथील सलीम सांडू शेख यांची मोबाईल शॉपी फोडून चोरी केली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा आरोपींना अटक केली. आरोपींकडून १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश आव्हाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पोलीस नाईक संतोष लोढे, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, आकाश काळे, शिवाजी ढाकणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.