जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. एल. बरालिया यांनी मंगळवारी या खटल्याचा निकाला दिला. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. अनिल सरोदे यांनी या खटल्यात कामकाज पाहिले. कालिदास बाळासाहेब बोडखे (वय २६ रा. वाळुंज पारगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. बाेडखे याने २९ मे २०१८ रोजी भिवसेन घुले व मच्छिंद्र घुले यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून त्यांना जखमी केले होते. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तत्कालीन उपनिरीक्षक एम. के. क्षीरसागर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेले साक्षीपुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.
दोघांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST