शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अपहरण, रेप, पोलिसांवर गोळीबार: ये अहमदनगर है़, या लूटमारनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:40 IST

तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़.

अरुण वाघमोडे /  अहमदनगर : गजबजलेल्या चौकातून उद्योजकाचे अपहरण, रस्त्याच्या कडेला वाहनात तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़. या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी सराईत गुन्हेगारांची वाढलेली ही हिंमत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नक्कीच घातक आहे.गुन्हेगारांबाबत ‘कानून के हाथ लंबे होते है’! असा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. नगर जिल्ह्याबाबत मात्र ‘कानून के हाथ हमारे यहाँ तो बंधे होते है’! असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांतील आणि काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सराईत गुन्हेगारांनी जनतेसह पोलिसांनाही हैराण करून सोडले आहे़. घरफोड्या, रस्तालूट, वाहनचोरी या घटना सुरूच असताना आता भरदिवसा आणि भरचौकातून अपहरण आणि पोलिसांवर गोळीबाराच्या घटना घडू लागल्याने जनतेमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कानून के हाथ लंबे करून पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशीच जनतेची मागणी आहे़.    नगर शहरातील सर्जेपुरा येथून १८ नोव्हेंबर रोजी अजहर मंजूर शेख या कुख्यात गुंडाच्या टोळीने प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली़. या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले असले तरी मुख्य सूत्रधार अजहर हा अजून फरार आहे. १९ नोव्हेंबर रोजी शहरातील क्लेरा ब्रुस विद्यालयाच्या मैदानाजवळ रस्त्यावरच एका वाहनचालकाने पिकअप वाहनात तरुणीवर अत्याचार केला. कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. २० नोव्हेंबर रोजी तर राहाता येथे सराईत गुन्हेगारांनी थेट पोलिसांवरच गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या घटनेत एका पोलीस कर्मचा-याला दोन गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी राहुरीत पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुन्हेगारांनी दगडफेक केली. गेल्या आठ दिवसात एकसलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा अपहरणाच्या घटना आणि थेट पोलिसांवर गोळीबार होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हुंडेकरी यांचे अपहरण करणारा अजहर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधी विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तर राहाता येथे पोलिसांवर गोळीबार करणारे आरोपी सचिन ताके व अमित सांगळे हे सराईत गुन्हेगार आहेत. प्रसिद्ध व्यक्तीचे अपहरण अथवा पोलिसांवर हल्ला या घटना एका दिवसांपुरत्या मर्यादित राहत नाहीत तर त्याचा दीर्घकाळ समाजमनावर परिणाम होत असतो़. यातून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. इतर गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी होतो. यातून गुन्हेगारीच्या घटना वाढतात़ सराईत गुन्हेगारांनी पुन्हा-पुन्हा गंभीर गुन्हे करू नयेत, यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘गुन्हेगारी दत्तक योजना’ ही संकल्पना जिल्ह्यात राबविली होती. शर्मा गेल्यानंतर मात्र या योजनेचे काय झाले? हे पोलिसांनाच माहिती.

 हत्यारांचाचा धाक दाखवून भरदिवसा लुटमार गुन्हेगारी जगतात लुटमारीसाठी युपी, बिहारचे उदाहरणे दिली जातात. प्रत्यक्षात मात्र नगर शहर व परिसरात त्यापेक्षाही भयानक लुटमारीच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि़२४) नगर शहरात तिघा चोरट्यांनी दुपारी तीन वाजता कारचालकाचा पाठलाग करून हत्यारांचा धाक दाखवित मारहाण करत त्याच्याकडील पैशाची बॅग लंपास केली. शहर व परिसरात आठ दिवसांत किमान तीन ते चार अशा स्वरुपाच्या घटना घडत आहेत. अंगावर दागिने घालून आणि घरातून पैसे घेऊन नगर शहरात यावे की, नाही असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी