शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

स्काउट गाइडचा गणवेश हजार रुपयाला, सरकार देते केवळ ३००

By चंद्रकांत शेळके | Updated: July 28, 2023 08:14 IST

शाळा व्यवस्थापन समितीपुढे प्रश्न : बूट-पायमोजे १७० रुपयांत कोण देणार?

चंद्रकांत शेळके, लोकमत न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : शालेय गणवेश योजनेत देण्यात येणारा दुसरा गणवेश शासनाने स्काउट व गाइड विषयास अनुसरून खरेदी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी केवळ ३०० रुपयांचा निधी दिला आहे. प्रत्यक्षात हा गणवेश बाजारात ६०० ते एक हजार रुपयांना  मिळतो. त्यामुळे हा गणवेश कसा घ्यायचा, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीला पडला आहे. शासनाने हा निधी वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे. 

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व मुली तसेच अनुसूचित जाती-जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. 

दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नव्हता. यावर्षीपासून तोही देण्यात येत आहे. गणवेश योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश जोडीसाठी ६०० रुपये निधी देण्यात येतो. दरम्यान, पहिल्या गणवेशासाठी शासनाने शाळा सुरू होण्याआधीच निधी दिलेला आहे. त्यातून शाळा व्यवस्थापन समित्यांनी एक नियमित गणवेश घेतलेला आहे. तर दुसरा गणवेश घेण्यासाठी १३ जुलै रोजी शासनाने निधी वर्ग केला आहे; परंतु, दुसरा गणवेश स्काउट व गाइड विषयास अनुरूप  घेण्याची अट घातली आहे. यामध्ये मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट, तसेच मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असे स्वरुप आहे.  तसेच विद्यार्थ्यांच्या शर्टवर शोल्डर स्ट्रीप व दोन खिसे असणे आवश्यक आहे.

३०० रुपयांत गणवेश खरेदी होऊ शकत नाही. महागाईच्या काळात ३०० रुपयांत गणवेश कसा घेणार? शासनाने यासाठी भरीव निधी देणे गरजेचे आहे. अन्यथा, मुलांना दर्जाहीन कपडे देऊन काय उपयोग?     - नीलेश लहाडे, अमोल सहाणे,     शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष

गणवेशाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि पायमोज्यांचे दोन जोड खरेदी करण्यासाठी प्रतिविद्यार्थी १७० रुपये निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे; परंतु, महागाई लक्षात घेता १७० रुपयांत बूट व मोजे खरेदी कसे करायचे. शासनानेच ते खरेदी करून द्यावे.     - एकनाथ मेंगाळ, सरपंच,     समशेरपूर, ता. अकोले