शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या न्याय, हक्कांसाठी मोठा लढा उभारणार - अशोक चौधरी

By साहेबराव नरसाळे | Updated: April 11, 2023 16:10 IST

पेन्शनबाबत सरकारने अन्यायकारक आणि चुकीचे धोरण अवलंबविले आहे.

अहमदनगर : देशाच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात. वेळप्रसंगी बलिदान देतात. सैनिकांच्या त्याग व समर्पित वृत्तीमुळे देशातील नागरिक सुरक्षित आहेत. मात्र सैनिकांची उपेक्षा आणि अवहेलना होते. पेन्शनबाबत सरकारने अन्यायकारक आणि चुकीचे धोरण अवलंबविले आहे. पेन्शन हा प्रत्येक लोकसेवकाचा हक्क आहे. मात्र, तो हक्क डावलला जात असून सर्वच माजी सैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे याविरोधात मोठा लढा उभारणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले.

इसळक निंबळक येथे  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य प्रवक्ते एस. के. आठरे, संजय म्हस्के, कॅप्टन शेख, निंबळक विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास कोतकर, संदीप महाराज कळसे, निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर, इसळकच्या सरपंच छाया गेरंगे, निंबळक सेवा सोसायटीचे संचालक पोपट खामकर, शेतकरी संघटनेचे संदीप गेरंगे, भाऊसाहेब कोतकर, उद्योजक बाळासाहेब साठे, बी. एम. कोतकर, आदी उपस्थित होते.

त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष एकनाथ आडसुरे यांनी निंबळक शाखेचा गत वर्षातील कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले की, ‘पहिल्या वर्षात नियोजित उपक्रम आणि कार्यक्रम योग्य पद्धतीने आणि समाधानकारक प्रतिसादाने पार पडले आहेत. आगामी काळात आणखी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे.’ प्रवक्ते एस. के. आठरे यांनी गुणवंत विद्यार्थी आणि शहिदांच्या पत्नींचा ‘वीर नारी’ गौरव करण्याची सूचना मांडली. उपस्थितांनी एकमताने या सूचनेचे स्वागत केले.

कार्यक्रमासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे सचिव शिवाजी सोनवणे, मारुती ताकपेरे, शरद कोरडे, सुनील कोतकर, आबासाहेब कोतकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गेरंगे यांनी केले. आभार अशोक कोतकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर