राहुरी येथील मराठा बहूद्देशिय संस्था संचालित मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील अडचणीत असलेल्या कुटुंबांना ९४ हजार रुपयांची मदत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू कुटुंबांना मदत करण्याचा मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उपक्रम राबविण्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर दोन दिवसात ९४ हजाराचा निधी गोळा झाला. ही सर्व मदत विविध गरजवंतांना सुपुर्द करण्यात आली. यावेळी मराठा बहूद्देशिय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, उपाध्यक्ष राजेंद्र लबडे, खजिनदार संदीप गाडे, महेंद्र शेळके, मच्छिंद्र गुंड, बंडूशेठ ऊर्फ अनिल घोरपडे, नरेंद्र शेटे उपस्थित होते.