शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी लोकसभा मतदारसंघात 9 सखी मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:19 IST

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.

शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. महिलांचा सहभाग असलेल्या या केंद्राला सखी मतदान केंद्र असे म्हटले जाणार आहे. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा विधानसभा क्षेत्रात 9 मतदान केंद्रांवर महिलाराज राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबध्दतेचा भाग म्हणून या लोकसभा निवडणूकीसाठी महिलांनी चालविलेले मतदान केंद्र असणार आहे.सखी मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी मतदान केंद्र परिसरात रांगोळी, सफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणूकीत दिव्यांग व महिला मतदारावर अधिक भर दिला आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार सखी मतदान केंद्र स्थापन करण्याचे आदेश असल्याने महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यास मदत होणार आहे. या केंद्रावर सर्व अधिकारी व कर्मचारी महिला राहतील. प्रत्येक मतदार संघातून एका मतदान केंद्राची सखी मतदार संघ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघात 9 मतदान केंद्राचा समावेश करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सखी केंद्र- मतदान केंद्र क्र. 128 अकोले, अगस्ती विद्यालय अकोले- मतदान केंद्र क्र. 129 अकोले, अगस्ती विद्यालय अकोले- मतदान केंद्र क्र. 155 पी. जे. आंबरे पाटील कन्या विद्यालय संगमनेर- मतदान केंद्र क्र. 90 शारदा विद्या मंदिर राहाता- मतदान केंद्र क्र. 60 जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी- मतदान केंद्र क्र. 100 नवीन म. अ. कार्यालय कोपरगाव- मतदान केंद्र क्र. 128 डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव- मतदान केंद्र क्र. 115 डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर- मतदान केंद्र क्र. 49 सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय नेवासा खुर्द

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019