शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

९३ वर्षांचा योगायोग : अकोलेतील विद्यार्थ्यांनी पाठवले इंग्लडच्या राणीला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:31 IST

अकोले तालुक्यातील शेंडी येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांना ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या भंडारदरा धरणास भेट देण्याचे निमंत्रण एका ई-मेलद्वारे दिले आहे.

राजूर : अकोले तालुक्यातील शेंडी येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांना ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या भंडारदरा धरणास भेट देण्याचे निमंत्रण एका ई-मेलद्वारे दिले आहे.भंडारदरा धरणाने वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आणि ९३ व्या वर्षांत पदार्पण केले. इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ यांचेही सध्याचे वय ९३ वर्षे आहे. हे वय पाहून आमच्या आश्रमशाळेचे कर्मचारी विकास पवार यांनी हा उपक्रम करण्याचे सुचवले. त्यानुसार शाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी या महाराणीला या धरणाच्या भेटीसाठी निमंत्रित करण्याचे पत्ररुपी संदेश इमेलद्वारे पाठविण्यात आल्याचे प्राचार्य अशोक भालेराव यांनी सांगितले. या पत्रामध्ये ब्रिटिश महाराणी, प्रिन्स व त्यांच्या पत्नी यांनाही आमंत्रित केले आहे.२ लाख २९ हजार एकर क्षेत्रातील शेतीला दुष्काळापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने २७० मीटर लांबीच्या आणि ८२.३४ मीटर उंचीच्या दगडी भंडारदरा (विल्सन डॅम) धरणाचे काम करण्यात आले. १९०३ मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता आर्थर हिल यांनी धरणाची जागा शोधून काढली तर सर्वेक्षणाचे काम सहायक अभियंता सी.बी. पुली यांनी केले. हे काम १९०९-१० च्या दरम्यान सुरु झाले. १९२६-२६ च्या मोसमात पूर्ण झाले. धरण बांधण्यासाठी ८४ लाख १४ हजार रुपये खर्च आला होता. १० डिसेंबर १९२५ रोजी तत्कालीन गव्हर्नरांच्या हस्ते आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भंडारदरा धरणाचे उद्घाटन झाले होते. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या धरणाचे पाणलोट क्षेत्र १२०.३२ चौरस किलोमीटर इतके आहे. पुढे १९६९ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने धरणास तडे गेले आणि मोठी शस्रक्रिया करण्यात आली. यात धरणाच्या भिंतीच्या मूळ स्वरूपात मोठा बदल घडवून आला. या उपक्रमाचे संस्थेचे सचिव प्रा.एम.एम.भवारी, अध्यक्ष भरत घाणे, माधव गभाले व इतरांनी कौतुक केले.

९३ वर्षांचा योगायोग : अकोलेतील विद्यार्थ्यांनी पाठवले इंग्लडच्या राणीला निमंत्रणराजूर : अकोले तालुक्यातील शेंडी येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांना ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या भंडारदरा धरणास भेट देण्याचे निमंत्रण एका ई-मेलद्वारे दिले आहे.भंडारदरा धरणाने वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आणि ९३ व्या वर्षांत पदार्पण केले. इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ यांचेही सध्याचे वय ९३ वर्षे आहे. हे वय पाहून आमच्या आश्रमशाळेचे कर्मचारी विकास पवार यांनी हा उपक्रम करण्याचे सुचवले. त्यानुसार शाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी या महाराणीला या धरणाच्या भेटीसाठी निमंत्रित करण्याचे पत्ररुपी संदेश इमेलद्वारे पाठविण्यात आल्याचे प्राचार्य अशोक भालेराव यांनी सांगितले. या पत्रामध्ये ब्रिटिश महाराणी, प्रिन्स व त्यांच्या पत्नी यांनाही आमंत्रित केले आहे.२ लाख २९ हजार एकर क्षेत्रातील शेतीला दुष्काळापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने २७० मीटर लांबीच्या आणि ८२.३४ मीटर उंचीच्या दगडी भंडारदरा (विल्सन डॅम) धरणाचे काम करण्यात आले. १९०३ मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता आर्थर हिल यांनी धरणाची जागा शोधून काढली तर सर्वेक्षणाचे काम सहायक अभियंता सी.बी. पुली यांनी केले. हे काम १९०९-१० च्या दरम्यान सुरु झाले. १९२६-२६ च्या मोसमात पूर्ण झाले. धरण बांधण्यासाठी ८४ लाख १४ हजार रुपये खर्च आला होता. १० डिसेंबर १९२५ रोजी तत्कालीन गव्हर्नरांच्या हस्ते आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भंडारदरा धरणाचे उद्घाटन झाले होते. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या धरणाचे पाणलोट क्षेत्र १२०.३२ चौरस किलोमीटर इतके आहे. पुढे १९६९ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने धरणास तडे गेले आणि मोठी शस्रक्रिया करण्यात आली. यात धरणाच्या भिंतीच्या मूळ स्वरूपात मोठा बदल घडवून आला. या उपक्रमाचे संस्थेचे सचिव प्रा.एम.एम.भवारी, अध्यक्ष भरत घाणे, माधव गभाले व इतरांनी कौतुक केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले