शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पदवीधरसाठी ७३ हजार मतदार

By admin | Updated: November 6, 2016 00:51 IST

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पदवीधारकांनी अखेरच्या दिवशी शनिवारी धडाकेबाज नोंदणी केली़

त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढवून ७३ हजार झाली असून, नाशिक विभागातील मतदार नोंदणीने २ लाखांचा टप्पा पार केला आहे़ नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली़ मतदार नोंदणीसाठी शनिवारी अखेरचा दिवस होता़ शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ५० हजार मतदार नोंदणी झाली़ अखेरच्या दिवशी जिल्हाभरातून २२ हजार ९१४ पदवीधरांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केले़ शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात विक्रमी नोंदणी झाल्याने जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची संख्या ७२ हजार ९२० झाली आहे़ सर्वाधिक संगमनेर तालुक्यात १७ हजार मतदार नोंदणी झाली़ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर तालुका मतदार नोंदणीत सुरुवातीपासूनच आघाडीवर होता़ या तालुक्यात शेवटच्या टप्प्यात दीड हजार मतदारांनी नोंदणी केली़ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री राम शिंदे यांचा जामखेड तालुका पदवीधर मतदार नोंदणीत पिछाडीवर आहे़ जामखेड तालुक्यात १ हजार ६९२ मतदारांची नोंदणी झाली़ मागील सार्वत्रिक निवडणुकीत ८९ हजार मतदार होते़ या मतदारांचा प्रशासनाने शोध घेतला होता़ जुन्या मतदारयादीतील ३७ हजार मतदारांचाच शोध लागला़ उर्वरित मतदार सापडले नाहीत़ त्यामुळे निवडणूक आयोगाने ऐनवेळी मतदार नोंदणी करण्याचे निर्देश दिले़ सुरुवातीला मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली होती़ मात्र अखेरच्या टप्प्यात मतदार नोंदणीचा आलेख वाढत गेला़ प्रशासकीय यंत्रणा, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या मोहिमेमुळे मतदारांनी कागदपत्रांची पूर्तता करत नोंदणी केली़ नाशिक, नंदूरबार, जवळगाव आणि धुळे जिल्ह्यातही मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळाला असून, अपेक्षेप्रमाणे मतदार नोंदणी झाली आहे़ प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून प्रारूप मतदारयादी येत्या २४ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे़ ही मतदार यादी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ग्राह्य धरली जाणार असल्याने वाढलेली मतदार नोंदणी कुणाच्या पथ्थ्यावर पडणार, या चर्चेला उधाण आहे़ नाशिक विभागातील नगरसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यांत शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे़ जिल्हानिहाय मतदार नोंदणी पुढीलप्रमाणे-४नगर- ७२ हजार ९२०, नाशिक-७८ हजार ५, नंदुरबार-१५ हजार ४७, जळगाव-३२ हजार १५३, धुळे- २४ हजार ४४७.अकोले- ५ हजार ३८७, संगमनेर-१७ हजार ५८८, राहाता-६ हजार ३९७, कोपरगाव-५ हजार ५६२, श्रीरामपूर-२ हजार ३९९, राहुरी-४ हजार २०१, नेवासा-५ हजार २४४, नगर-६ हजार २५७, शेवगाव-२ हजार ७८५, पाथर्डी-३ हजार ५१३, श्रीगोंदा-३ हजार ८०५, पारनेर-३ हजार ८३३, कर्जत-३ हजार २२३, जामखेड- १ हजार ६९२, जिल्हा निवडणूक शाखा- १ हजार ३४ .