शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

विद्यार्थ्यांच्या हाती ७ लाख वह्या

By admin | Updated: June 17, 2014 00:35 IST

पारनेर : महानगर बँकेचे संस्थापक गुलाबराव शेळके प्रतिष्ठानने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटलेल्या सात लाख वह्या, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेली

पारनेर : महानगर बँकेचे संस्थापक गुलाबराव शेळके प्रतिष्ठानने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटलेल्या सात लाख वह्या, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेली पावणेतीन लाख पुस्तके व म्हस्केवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांने ट्रकभर वाटलेले शालेय साहित्य असा खजिनाच पारनेर तालुक्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळाला.पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोमवारी शाळेचा पहिलाच दिवस होता. शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत झालेच. पण पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप शालेय शिक्षण विभागाने राबविला़ त्यामुळे सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांना पावणेतीन लाख पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचे गटशिक्षणअधिकारी के. एल. पटारे यांनी सांगितले. शिक्षणविस्तारअधिकारी कुंडलिक ढोरमले, मंजाबापु तांबे, विनीत लाळगे व केंद्र प्रमुखांनी याचे नियोजन केले. महानगर बँकेचे संस्थापक गुलाबराव शेळके सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके, महानगरचे संचालक सुरेश ढोमे, अनिल चौधरी, बाळासाहेब काळभोर, डॉ. नरेंद्र मुळे यांच्या हस्ते अनेक शाळांमध्ये पहिली ते दहावीच्या साठ हजार विद्यार्थ्यांना मोफत सात लाख वह्या वाटप करण्यात आल्या़ म्हस्केवाडी प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी व मुंबईचे पोलीस निरीक्षक संतोष खडके यांनी वह्या, पुस्तके, कंपास व इतर शालेय साहित्य असणारी एक ट्रक भरूनच शाळेसमोर आणली़ शाळेच्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले़ विद्यार्थ्यांच्या हातात शालेय साहित्य पडताच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला़ (तालुका प्रतिनिधी)वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले मुलांचे स्वागत पारनेर तालुक्यात सर्वाधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दरोडी येथे जि.प.प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अरूण कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मंदा भोसले, सरपंच कैलास कड, उपसरपंच मंगल भोसले, तुकाराम पावडे, शिक्षक दादाभाऊ कोल्हे, नामदेव शेरकर, राजेश गायकवाड, अनिल पावडे उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी ढवळपुरीच्या आदीवासी भागातील लमाणतांडा येथील शाळेत मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले़ यावेळी केंद्र प्रमुख भास्कर गागरे, नेमिचंद राठोड, अनिता राठोड, काशिनाथ चव्हाण, देवीदास राठोड, मुख्याध्यापक राजू नरवडे, रहेमान शेख आदी उपस्थित होते़ रोहिदास पवार यांनी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन दिले़अधिकाऱ्यांच्या स्वागताने चिमुकले हरखली शाळेच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांनीही जोरदार तयारी केली होती़उपमुख्यकार्यकारी अधिकारी जगताप यांनी वाळवणे, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक गावडे यांनी राळेगणसिध्दी, नारायणगव्हाण येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. खडकवाडी कुरणवाडी येथे मुुख्याध्यापक रंगनाथ रोहोकले, बापु तांबे यांनी स्वागत केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच शाळेत येऊन स्वागत केल्याने चिमुकली मुलेही हरखुन गेले.