शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जिल्ह्यातील ६८ टक्के रुग्ण गेले घरी, केवळ ३२ टक्के रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:26 IST

अहमदनगर : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे गेल्या महिन्यात ८० टक्क्यांच्या पुढे होते. मात्र गत आठवड्यापासून रोज २० ते २५ रुग्ण वाढत आहेत. तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत असल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या ही समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

सुदाम देशमुखअहमदनगर : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे गेल्या महिन्यात ८० टक्क्यांच्या पुढे होते. मात्र गत आठवड्यापासून रोज २० ते २५ रुग्ण वाढत आहेत. तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत असल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या ही समाधानकारक असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात पहिला रुग्ण १२ मार्चला आढळला. त्यानंतर रोज एक ते दोन रुग्ण जिल्ह्यात आढळून यायचे. त्याची संख्या आता थेट २५ ते ४१ पर्यंत गेली आहे. सुरवातीच्या काळात १४ दिवसानंतर रुग्णाला बरे झाल्यानंतर सोडले जात होते. आता आठ ते दहा दिवसांनी रुग्ण बरे होत असून त्यांना घरी सोडले जात आहे. सरासरी रोज वाढणाºया रुग्णांची संख्या ही २५ असली तरी रोज सरासरी १५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले जात आहे. जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे रुग्णांवर उपचार करण्यात येत असून काही रुग्ण सध्या इतर जिल्ह्यातही उपचार घेत आहेत.--------------------रुग्ण बरे होण्याची स्थितीतारीख           एकूण बाधित    बरे झालेले रुग्ण     टक्केवारी६ जून            २०७                         १०९                ५२.६५१३ जून        २५१                          १९८                ७८.८८२० जून       २८२                            २३७               ८४.०४२७ जून       ३९७                              २७३             ६८.७६४ जुलै       ५४४                              ३६९               ६७.८३०५ जुलै      ६१८                             ४००                ६४.७२(रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण-६८.८३ टक्के)-----------------राज्याची स्थितीदिवस        रुग्ण बरे६ जून        ४५.०६ टक्के१३ जून    ४७.२० टक्के२० जून    ५०.९४ टक्के२७ जून    ५२.९४ टक्के४ जुलै     ५४.०२ टक्के----------------

राज्यापेक्षा १४ टक्क्यांनी प्रमाण अधिकराज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४ टक्के आहे, तर नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६८ टक्के आहे. राज्यातील रुग्णांची संख्या ही २ लाख ६४ हजार इतकी आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ८२ रुग्ण घरी (दि. ४ जुलैचे आकडे) गेले आहेत. ही संख्या मोठी असल्याने प्रमाण हे कमी दिसत असले तरी राज्यापेक्षा नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे १४ टक्क्यांनी अधिक आहे. लवकर निदान, उपचारांचे बदलते प्रोटोकॉल, मृत्युदरात घट, रुग्णाचे मानसिक बळ यामुळे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ६३८ इतके एकूण रुग्ण आहेत, तर जिल्ह्यात बरे होणाºया रुग्णांची संख्या ४०० इतकी झाली आहे.--------------कोठे आहेत रुग्णजिल्हा रुग्णालय- २६०एम्स हॉस्पिटल-१५जिल्हा रुग्णालय आयसीयू-८बूथ हॉस्पिटल-९७प्रवरा ट्रस्ट, लोणी-१०साई संस्थान, शिर्डी-३एसएसजीएम, कोपरगाव-६ग्रामीण रुग्णालय, संगमनेर-१६नाशिक जिल्हा रुग्णालय-१वडाळा महादेव (श्रीरामपूर) रुग्णालय-६दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे- २ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल, मुंबई-२संगमनेर खासगी हॉस्पिटल- २पारनेर खासगी हॉस्पिटल-१नाशिक येथील खासगी हॉस्पिटल-५-----------------उपलब्ध सुविधाआतापर्यंत घेतलेले सॅम्पल-६१७२आतापर्यंत पॉझिटिव्ह- ६३८आतापर्यंत निगेटिव्ह- ५२४२घरी सोडलेले -४००चाचणीस नकार -४४बेडची संख्या-८९०विलगीकरणाची ठिकाणे- ४ क्वारंटाईनची ठिकाणे-२८क्वारंटाईन रुग्ण-३२९५होम क्वारंटाईन-१४७५संस्थात्मक क्वारंटाईन-६९३इतर क्वारंटाईन-२६०दुसºयांदा पॉझिटिव्ह रुग्ण-१२

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या