शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

अकरावीसाठी ६५ हजार जागा

By admin | Updated: June 17, 2014 00:37 IST

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवार

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवार (आज दि.१७) मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर होणार आहे. दुपारी १ नंतर संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने हा निकाल पाहता येणार आहे. जिल्ह्यात अकरावीसाठी कला, शास्त्र आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये ६५ हजार जागा आहेत. निकालानंतर काही ठरावीक ठिकाणी प्रवेशासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मार्च २०१४ ला दहावीची परीक्षा झाली होती. जिल्ह्यातून यंदा परीक्षेसाठी ७३ हजार ७९५ विद्यार्थी बसले होते. दहावीचे परीक्षा फॉर्म परीक्षा मंडळाने आॅनलाईन भरून घेतल्याने अनेक ठिकाणी अडचणी आल्या होत्या. त्यावर ऐनवेळी मात करत परीक्षा पार पडल्या होत्या. या परीक्षेचा आज निकाल जाहिर होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कला शाखेच्या ३४३ तुकड्या असून त्या ठिकाणी २९ हजार ५२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. विज्ञान शाखेच्या २७२ तुकड्या असून २४ हजार ५२० क्षमता असून वाणिज्य शाखेच्या ८१ तुकड्या असून ७ हजार ९६० आणि संयुक्त शाखेच्या २० तुकड्या असून त्या ठिकाणी १ हजार ६८० प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात तिन्ही विभागाच्या ७१४ तुकड्या असून ६३ हजार ६०० प्रवेश क्षमता आहे. २६ जूनला प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेची मूळ गुणपत्रिका मिळणार आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.शहरात दहा हजार प्रवेश क्षमतानगर शहर आणि उपनगरात अकरावी प्रवेशासाठी मराठी माध्यमाचे ३१, उर्दू माध्यमाचे ३ आणि इंग्रजी माध्यमाचे कनिष्ठ महाविद्यालय अथवा उच्च माध्यमिक विद्यालय आहे. यात कला शाखेच्या ४४ तुकड्या आणि ३ हजार ९६० प्रवेश क्षमता, विज्ञान शाखेच्या ३६ तुकड्या आणि ३ हजार ३२० प्रवेश क्षमता, वाणिज्य शाखेच्या २ हजार ४०० प्रवेश क्षमता आणि संयुक्त माध्यमाच्या २ तुकड्या आणि १६० प्रवेश क्षमता आहे. असे शहरात १०७ तुकड्यांतून ९ हजार ८४० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

गुणवंतांचे कौतूक आम्ही करु ..दहावीत ज्या विद्यार्थ्यांना ९५ किंवा त्यापेक्षा अधिक टक्के गुण मिळाले आहेत, त्यांनी आपले छायाचित्र आणि गुणपत्रिकेची झेरॉक्स लोकमत कार्यालयात आणून द्यावी.