शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

६० किलोमीटरवरचा शत्रू हेरणारे रडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:09 IST

सीमारेषेपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून आलेला शत्रू हेरणारे अत्याधुनिक रडार, पाणी व जमिनीवरून चालणारा १४ टनी रणगाडा व त्यावर सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत बॉम्ब फेकणारी मशीन, किरर्र अंधारातही सुमारे सहा किलोमीटरपर्यंत शत्रूला हेरणारी दुर्बिण यासह अत्याधुनिक बंदुका, लाँचर, मिसाईल आणि बरेच काही...

अहमदनगर : सीमारेषेपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून आलेला शत्रू हेरणारे अत्याधुनिक रडार, पाणी व जमिनीवरून चालणारा १४ टनी रणगाडा व त्यावर सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत बॉम्ब फेकणारी मशीन, किरर्र अंधारातही सुमारे सहा किलोमीटरपर्यंत शत्रूला हेरणारी दुर्बिण यासह अत्याधुनिक बंदुका, लाँचर, मिसाईल आणि बरेच काही...येथील मॅकेनाईल्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) शुक्रवारी आयोजित केलेल्या शस्त्र प्रदर्शनात लष्कराची आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धसामग्री नागरिकांना दाखवण्यात आली. सकाळी दहा वाजता एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. केंद्रीय विद्यालय, आर्मी पब्लीक स्कूल, तसेच शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. भारतीय लष्कराचे सामर्थ्य व क्षमतेची ओळख सामान्य नागरिकांना व्हावी, तसेच लष्कराकडे युवकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन लष्कराने आयोजित केले होते. प्रारंभी मिलिट्री बँडच्या पथकाने अनेक देशभक्तीपर गाण्यांवर प्रात्यक्षिके सादर केली. रणगाडे, वाहने, शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी खुली झाली. सैनिकांचे देशाप्रती योगदान, अथक परिश्रम व युद्धसामग्री पाहून विद्यार्थी, नागरिक हरखून गेले.कॅरिअर मोर्टर ट्रॅक्ड (सीएमटी)सहा आसनी व १४ टनी असणारा हा रणगाडा पाणी व जमिनीवर एकाच वेळी चालतो. यावर असलेल्या तोफेतून ५ किलोमीटरपर्यंत अचूक बॉम्ब वर्षाव होऊ शकतो. ११० बॉम्बचा साठा यात असतो. युद्धजन्य स्थितीत शत्रूच्या हद्दीतून सैनिक वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होतो.मिलन सिस्टीमएकाच वेळी पाच मिसाईल घेऊन जाणारी ही जीप युद्धात सर्वात पुढे असते. चालक, कॅप्टन व गनर असे तिघेच या वाहनात असतात. चालत्या वाहनातून सुमारे २ किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची क्षमता यातील लाँचरमध्ये आहे. फ्रान्स व पश्चिम जर्मनीच्या बनावटीची ही यंत्रणा आहे.५.५६ एमएम इन्सास एलएमजीही एक अशी रायफल आहे, जी प्रत्येक जवानाकडे असते. ३० राऊंडची मॅकझिन यात असते, जी १ किलोमीटरपर्यत अंतरावरील शत्रू अचूक टिपू सकते. अ‍ॅटो फायरची सुविधाही यात आहे.आरएल एमके ३हे एक असे लाँचर आहे, ज्यातून दोन किलोमीटर अंतरापर्यंत मिसाईल फायर केले जाते. विशेषत: यातून अशी मिसाईल फायर होतात, जी युद्धभूमीवर अंधारात काही वेळ प्रकाश पाडू शकतात. तसेच शत्रूला चकमा देण्यासाठी दिवसाही धुराचा अंधार करू शकतात.एचएचटीआय ही अशी दुर्बिणसदृश यंत्रणा आहे, जी सुमारे सहा किलोमीटरवरील लक्ष्य मिट्ट अंधारातही हेरू शकते. युद्धात रात्रीच्या वेळी या यंत्रणेचा खूप उपयोग होतो.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर