शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात आढळल्या ५७ हजार कुणबी नोंदी; समितीचे काम युद्धपातळीवर

By चंद्रकांत शेळके | Updated: November 7, 2023 21:45 IST

५२ हजार प्रमाणपत्र, तर ४ हजार दाखल्यांवरील नोंदी

अहमदनगर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा, तसेच कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षही कार्यान्वित करण्यात आला असून, तीन दिवसांत ५७ हजार नोंदी आढळल्या आहेत. यात जात पडताळणी समितीकडून दिलेले ५२ हजार ६७७ कुणबी प्रमाणपत्र आहेत, तर ४ हजार ११ नोंदी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सापडल्या आहेत.

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे. त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसांत प्राथमिक शाळांमधील ११ लाख १४ हजार शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदी तपासल्या असून, यात ४ हजार ११ जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. दुसरीकडे जात पडताळणी समितीकडून २१ नोव्हेंबर २०१६ पासून म्हणजे ही समिती जिल्ह्यात सुरू झाल्यापासून आजपर्यंत ५२ हजार ६७७ कुणबी दाखले वितरित केले आहेत. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत ५६ हजार ६८८ जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीची माहिती प्राप्त झाली आहे.

मोठ्या प्रमाणात नोंदी सापडण्याची शक्यताजात पडताळणी समितीने आतापर्यंत ५२ हजार ६७७ कुणबी दाखले दिलेले आहेत. मात्र, इतर ठिकाणीही अजून बऱ्याच नोंदी सापडत आहेत. महसूल, पोलिस यंत्रणा, खरेदी-विक्री दस्तऐवज, नगर शहरातील वस्तुसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या, शाळेतील दाखल्यांचे रेकॉर्ड यांचा शोध संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडण्याची शक्यता आहे.