शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरी चारीसाठी ५३ कोटी

By admin | Updated: October 27, 2023 15:17 IST

करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील सुमारे चौदा गावांसाठी वरदान ठरणार्‍या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी सुमारे ५३ कोटींचा निधी मंजूर झाला

करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील सुमारे चौदा गावांसाठी वरदान ठरणार्‍या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी सुमारे ५३ कोटींचा निधी मंजूर झाला असून यासंदर्भात मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली आहे. पाथर्डी-नगर तालुक्यातील सुमारे चौदा गावांचा या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला असून, यासाठी ५३ कोटींचा निधी मिळणार असून, ३२ पाझर तलावांचा यामध्ये समावेश असून, पाणी मुळा धरणातून उचलले जाणार आहे. मुळा धरण ते उदरमलपर्यंत लोखंडी पाईपलाईन वापरली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पालकमंत्री मधुकर पिचड, माजी खा.प्रसाद तनपुरे, पाटबंधारे विभागाच्या मुख्य सचिव नलिनी शंकर, एकनाथ पाटील, मुख्य अभियंता सावळे, पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पालवे, राजेंद्र दगडखैर यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. वांबोरी चारी टप्पा दोनचे काम त्वरित मार्गी लागावे यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला शासन मंजुरी देणार आहे. वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला होता. मात्र त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याने तो परत पाठवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पाटबंधारे विभागाने त्रुटी दूर करून तो प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे मुंबई येथे पाठवला. त्यानंतर तो प्रस्ताव शासनाने स्वीकारला आहे. आता वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली असून, टप्पा दोनचे काम त्वरित सुरू करण्यासाठी माजी खा.प्रसाद तनपुरे, प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जि.प. उपाध्यक्षा मोनिका राजळे, पं.स. उपसभापती संभाजीराव पालवे, माजी जि.प. सदस्य मोहनराव पालवे, अरूण आठरे, काशिनाथ लवांडे, संभाजी वाघ यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वांबोरी चारी प्रश्न मार्गी लागला तर पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (वार्ताहर)