शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी ५ मित्र गेले; पण घात झाला, एकाचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:07 IST

काही अंतरावर पाटाच्या पाण्यात त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

Ahilyanagar: राहुरी विद्यापीठ परिसरात मुळा उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी पोहता येत नसल्याने पाण्यात संकेत तरटे बुडाले. आरडाओरड झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी एका विद्यार्थ्यास वाचवले पण दुसरा विद्यार्थी वाहून गेल्याने तो सापडला नाही. बुधवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास शोध मोहिम राबवली होती. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी काही अंतरावर पाटाच्या पाण्यात त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. संकेत श्रीपती तरटे (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

राहुरी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या दहावीतील संकेत तरटे, ओम जगदाळे,  युवराज मोरे, तेजस कांदे तसेच आणखी एक असे पाच विद्यार्थी बुधवारी शाळेत जाण्याऐवजी विद्यापीठ परिसरातील पाटात पोहायला गेले. सायंकाळी चारच्यादरम्यान संकेत श्रीपती तरटे (रा. राहुरी) व तेजस कांदे (रा. डिग्रस) हे दोघे कपडे काढून पाटाच्या पाण्यात उतरले. त्यांना पोहता येत नसल्याने संकेत तरटे हा पाण्यात बुडून वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा देखील पाण्यात बुडायला लागला. यावेळी त्याने आरडाओरडा केला. पाटाजवळच राहणारे प्रशांत गावडे, भानुदास रोडे, अजय गावडे या तरुणांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी पाण्यामध्ये उडी मारून बुडत असलेल्या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना तेजस कांदे याला वाचविण्यात यश आले. त्याला ताबडतोब अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संकेत तरटे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व सुरक्षारक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पाटबंधारे अधिकारी सायली पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुळा उजवा कालव्याचे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह 

दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी डिग्रस येथील एका तरुणाला घटनास्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर पाटाच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला. परिसरातील राहुल गायकवाड, म्हाळु हळोनोर, अविनाश भिंगारदे, सोनू कोकाटे, अक्षय गोसावी या तरुणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर