शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात ५ दुचाकींचे जळीत कांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 14:16 IST

अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील शारदानगरमध्ये अशोक कचरू टेंबरे यांच्या घराच्या आवारात लावलेल्या ५ दुचाकी रॉकेल टाकुन जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव : अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील शारदानगरमध्ये अशोक कचरू टेंबरे यांच्या घराच्या आवारात लावलेल्या ५ दुचाकी रॉकेल टाकुन जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शारदानगरमध्ये अशोक टेंबरे यांचा बंगला असून येथेच करणीदान चरण हे भाडेकरू म्हणून राहतात. रविवारी रात्री टेंबरे व चरण हे नियमीतपणे आपल्या दुचाकी बंगल्याच्या आवारात लावून झोपले. दरम्यान मध्यरात्रीनंतर अचानक आग व धुराचे लोळ निघून स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यामुळे टेंबरे यांनी घराचा दरवाजा उघडून बघितले असता दुचाकी जळत असल्याचे दिसले. आरडाओरड झाल्यावर आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर नगरपालिकेच्या अग्नीशामक दलास पाचारण करून रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत टेंबरे यांच्या मालकीच्या टिव्हीएस स्टार (क्रमांक एम.एच.१७, एक्स.८४०३), पॅशन प्रो (क्रमांक एम.एच.१७, ए.के.९४३९), स्कुटी (क्रमांक एम.एच.१७, वाय. २७१९), हिरो मोटो (क्रमांक एम.एच.१५, सी.एक्स.५४१७) तर चरण यांच्या मालकीची हिरो पॅशन (क्रमांक एम.एच.१७, व्ही.यु.१७५३) या दुचाकी जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. जळीताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी टेंबरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूध्द जळीताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव