शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

४८ कठ्यांची नवसपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 23:25 IST

राजूर : हजारो भाविकांच्या साक्षीने कुलदैवत बिरोबाच्या जयघोषात अकोले तालुक्यातील कौठवाडी येथे ४८ नवसाचे पेटते कठे डोक्यावर मिरवत भक्तांनी नवसपूर्ती फेडली.

राजूर : हजारो भाविकांच्या साक्षीने कुलदैवत बिरोबाच्या जयघोषात अकोले तालुक्यातील कौठवाडी येथे ४८ नवसाचे पेटते कठे डोक्यावर मिरवत भक्तांनी नवसपूर्ती फेडली.मोठा माठ तळाच्या बाजूने कापत तो जमिनीवर उपडा ठेवला जातो. यात सौंदड, सादडा यांसारख्या कडक असणाऱ्या लाकडाच्या ढलप्या विशिष्ट आकाराने रचतात. त्याच्यावर पांढरेशुभ्र कापड गुंडाळलेले असते. या माठाला रंग देत फुलांच्या माळांनी सजविलेला असतो. या पद्धतीने नवसाचा कठा तयार केला जातो. यात गोडेतेल ओतले जाते. हे तेलही नवसपूर्तीनुसारच त्यात ओतले जाते. अशा प्रकारे तयार केलेले हे कठे देवाची काठी मंदिराच्या गाभाऱ्यात स्पर्श केल्यानंतर पेटविले जातात. हे कठे ज्वाला ओकू लागले की, मंदिराच्या बाहेरील मोकळ्या जागेत चित्कार करणारे भक्तगण डोक्यावर घेत मंदिराभोवती एकपासून तर मध्यरात्रीच्या बारापर्यंत काही भक्त फेरे मारत असतात.आदिवासी पट्ट्यातील कठ्याची यात्रा बघण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे या जिल्ह्यांतूनही भाविक येत असतात. श्रद्धेपोटी बिरोबाला बोलले जाणारे नवस फेडण्यासाठी भाविक हे कठे ठेवत असतात. यातील परंपरेनुसार पहिला कठा उचलण्याचा मान हा भोईरांचा असतो. भोईरांनी कठा उचलला की अन्य भक्त हे कठे डोक्यावर घेतात.यावर्षी नवसपूर्तीसाठी ४८ कठे मांडण्यात आले होते. पेटते कठे मंदिराभोवती फिरवत असताना या कठ्यांच्या ज्वालांनी सभोवतालचा परिसर उजाळून निघत होता तर आसमंत बिरोबाच्या जयघोषांनी दुमदुमून गेला होता. हा अनोखा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी रविवारी रात्री उच्चांकी गर्दी झाली होती. यात्रा कमिटीचे योग्य नियोजन व राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी दक्षता घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. रविवारी मध्यरात्री बाराला पाच मिनिटे बाकी असताना अखेरचे कठे भक्तांच्या डोक्यावरून उतरविण्यात आले. सुमारे दीड तासाहून अधिक वेळ हा कार्यक्रम रंगला होता. (वार्ताहर)