शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

४७ हजार कर्मचा-यांचा उपाशीपोटी कोरोनाशी लढा; चार महिन्यांचा पगार थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 11:31 IST

गावपातळीवर कोरोनाशी लढा देणा-या ग्रामपंचायत कर्मचा-यांचे चार महिन्यांचे वेतन थकले असून, राहणीमान भत्ता देण्यासही ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ केली जात आहे़. त्यामुळे राज्यातील ४७ हजार कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे़. 

अण्णा नवथर । अहमदनगर : गावपातळीवर कोरोनाशी लढा देणा-या ग्रामपंचायत कर्मचा-यांचे चार महिन्यांचे वेतन थकले असून, राहणीमान भत्ता देण्यासही ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ केली जात आहे़. त्यामुळे राज्यातील ४७ हजार कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे़.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर कोरोना आपत्ती निवारण, सारी सर्वेक्षण, दक्षता यासह अन्य समित्या सरकारने स्थापन केल्या आहेत़. समित्यांमध्ये  सदस्य इतर विभागाचे कर्मचारी असले तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायतींचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत़. राज्यात २७ हजार ग्रामपंचायती आहेत. आकृतिबंधानुसार ग्रामपंचायतींमध्ये लिपीक, पाणीपुरवठा, आरोग्य आदी विभागात ४७ हजार २३६ कर्मचारी कार्यरत आहेत़. हे कर्मचारी कोरोनाच्या संकट काळात आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत़. इतर विभागातील कर्मचाºयांना नियमित वेतन मिळते़ परंतु, ग्रामपंचायत कर्मचाºयांचे मात्र गेल्या जानेवारीपासूनचे पगारच झालेले नाहीत़. किमान वेतनासोबतच ग्रामपंचायतींकडून राहणीमान भत्ता दिला जातो़. हा भत्तादेखील ग्रामपंचायतींकडून नियमित दिला जात नाही़. कोरोनामुळे ग्रामपंचायतींची कर वसुली थांबलेली आहे़. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक संकटाचे कारण पुढे करीत कर्मचा-यांना भत्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत. याकडे जिल्हा परिषदांचे दुर्लक्ष  होत आहे़. त्यामुळे गाव पातळीवर कोरोनाशी लढा देणा-या ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ असून, कर्मचा-यांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.विमा संरक्षणाचे भिजत घोंगडेराज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचा-यांना २५ लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला़ ग्रामविकास खात्यातील कर्मचाºयांनाही हा विमा लागू आहे़ पण, याबाबतही अद्याप कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, ग्रामपंचायत कर्मचा-यांना हा विमाही लागू झालेला नाही़ 

राज्यातील ग्रामपंचायतींचे कर्मचारी कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून काम करत आहेत़ परंतु, या कर्मचा-यांना सुधारित वेतनानुसार पगार तर नाहीच़ पण त्यांना मिळणारे किमान वेतनदेखील जानेवारीपासून मिळालेले नाही़ बहुतांश ग्रामपंचायतींकडून राहणीमान भत्ता देखील दिला जात नसून, सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस गिरीष दाभाडकर यांनी सांगितले.

टॅग्स :ahmedabadअहमदाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारLabourकामगार