शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषद शाळेतील ४२ विद्यार्थी इस्त्रो सहलीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 19:55 IST

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष गुण मिळवित सहलीची संधी मिळविली असून, जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी सोमवारी दुपारी केरळला रवाना झाले. यावेळी पालकांनी जिल्हा परिषदेत मोठी गर्दी केली होती.

अहमदनगर : सहलींचे आयोजन सर्वच शाळांकडून केले जाते. मात्र जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष गुण मिळवित सहलीची संधी मिळविली असून, जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी सोमवारी दुपारी केरळला रवाना झाले. यावेळी पालकांनी जिल्हा परिषदेत मोठी गर्दी केली होती.जिल्हा परिषदेच्या सभागृहात सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे. सहलीत मिळणारे ज्ञान व अनुभवाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना यानिमित्त विमान प्रवासासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करणा-या इस्त्रो संस्थेला भेट देण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी परत आल्यावर आपले अनुभव इतर विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्यामध्येही जागृती करावी, असे आवाहन यावेळी विखे यांनी केले.शिक्षण विभागाने निबंध लेखन स्पर्धा आणि प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे सहलीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २३ मुली व १९ मुलांचा समावेश आहे. विद्यार्थी बेंगलूरू येथील सर विश्वेश्वरय्या म्युझियम, त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, म्युझियम, साऊंड रॉकेट शो, प्राणी संग्रहालय व मत्स्यालयास भेटी देणार आहेत. पुण्याहून बेंगलूरुपर्यंतचा तसेच बेंगलूरूहून त्रिवेंद्रमपर्यंतचा प्रवास विमानाने होणार आहे. दि.१९ जानेवारी रोजी सहल नगरला पतरणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ, विकास साळुंके, शबाना शेख, निवेदिता जाधव, अमोल गोसावी रवाना झाले आहेत. विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी पालकांनीही मुख्यालयात गर्दी केली होती. दि.१९ जानेवारी रोजी सहल नगरला पतरणार आहे. यावेळी उपाध्यक्षा घुले, सदस्य संदेश कार्ले यांची भाषणे झाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरisroइस्रो