जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षांमधील २४ तसेच १७ अपक्ष मिळून एकूण ४१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. महायुतीच्या घटक पक्षातील भाजपाने १५ उमेदवार उभे केले होते. त्यांना ४ हजार १२४ मते मिळाली. एका उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेने सहा उमेदवार उभे केले होते. त्यांना २ हजार ८५९ मते मिळाली. चार उमेदवार विजयी झाले. एक उमेदवार तीन मतांनी पराभूत झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने २१ पैकी २० प्रभागांमध्ये निवडणूक लढविली. या पक्षाला ६ हजार ३७९ इतकी मते मिळाली. एका उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. दहा उमेदवार विजयी झाले. दहा उमेदवार पराभूत झाले. कॉँग्रेसचे पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या पक्षाला १ हजार २८३ मते मिळाली. पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. ‘मनसे’चे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पैकी एक उमेदवार विजयी झाला. तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. पक्षाला एकूण ४४६ मते मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाने अकरा उमेदवार उभे केले होते. एक वगळता दहा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या पक्षाला एकूण ४५१ मते मिळाली. ४१ अपक्षांनी निवडणुकीत नशीब अजमावले. त्यामध्ये शहर विकास आघाडीचा समावेश होता. आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. आघाडीचे १६ उमेदवार रिंगणात होते. मान्यता प्राप्त नसल्यामुळे त्यांची गणना अपक्षांमध्ये केली गेली. या सर्व अपक्षांना ६ हजार १३१ मते मिळाली. तीन जण विजयी झाले. (तालुका प्रतिनिधी)
४१ उमेदवारांची अनामत जप्त
By admin | Updated: January 15, 2016 23:28 IST