अहमदनगर: जुलै संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही़ त्यामुळे पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, जिल्ह्यातील २७० गावे व एक हजार ३२० वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ प्रादेशिक पाणी योजना सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करण्याचे यावेळी ठरले़जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाती जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली़ बैठकीनंतर पिचड यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली़ पिचड म्हणाले, पिण्यासाठी पुणे व नाशिक जिल्ह्यातून पाण्याची मागणी करण्यात आली आहे़ तसा प्रस्तावही सरकारकडे पाठविला आहे़़ कुकडी प्रकल्पातून श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर साठी पाणी आणण्याचा निर्णय झाला आहे़ तर उत्तरेतील कोपरगाव व राहता शहरांसाठी दारणा धरणातून पाण्याची मागणी करण्यात आली आहे़ मुळा धरणात नुकत्याच झालेल्या पावसामुळे दीड टीएमसी नवीन पाणी आले़ भंडारदरा धरणात अडीच टीएमसी पाण्याची आवक झाली असून, श्रीरामपूरसाठी पाणी सोडण्यात आले आहे़ उर्वरित गावांना ३६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ जिथे टँकरची आवश्यकता आहे, तिथे टँकर पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ याशिवाय टँकरने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांत टाक्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले़पाऊस न पडल्याने पेरणीत कमालीची घट झाली़ जिल्ह्यात अवघ्या १३ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ खरीप हंगाम पूर्ण वाया गेला़ त्यामुळे चारा आणायचा कुठून असा प्रश्न आहे़ खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातून चारा बाहेर जाणार नाही,याची काळजी घेतली जाईल़ राहुरी कृषी विद्यापीठात ४५० हेक्टरवर कडबा पेरणी करण्याचे नियोजन आहे़ दुष्काळासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही़ मात्र प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़ अधिकाऱ्यांनी स्वत: गावात जावून तिथे काय परिस्थिती आहे, कोणत्या उपाय योजना करता येतील, याची माहिती घेऊन अहवाल तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत़ त्याचबरोबर जलसंधरणाच्या कामांचेही नियोजन करण्यात येणार आहे़ सध्या पिण्याचे पाणी आणि जनवरांच्या चाऱ्यास प्रधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी पिचड यांनी सांगितले़ जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता आनंद वडार आदी यावेळी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)दुष्काळाचे राजकारण... गारपीटीच्या पैशाचे वाटप झाले आहे़ पाणीटंचाईवरही उपाय योजना सुरू आहेत़ मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने दुष्काळाचेही राजकारण केले जात असल्याचे सांगून पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी नाराजी व्यक्त केली़ पालकमंत्री पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टंचाईचा आढावा घेण्यात आला़ या बैठकीत पाणीपुरवठा करणे, पुणे व नाशिक जिल्ह्यातून पाण्याची मागणी, यासारख्या उपाय योजनांवर चर्चा झाली़ निवडणुका जवळ आल्या आहेत़ त्यामुळे टंचाईतही राजकारण आणले जात असल्याचे सांगून पिचड म्हणाले, खरिपाची पेरणी न झाल्यामुळे जिल्ह्यातील ६७० गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे़ आणेवारी कमी असलेल्या गावात उपाय योजना सुरू आहेत़ आवश्यक तिथे पाणीपुवठा होत आहे़ मात्र टँकरच्या मागणीसाठी मोर्चे आणि आंदोलने करण्यात येत असून, काहींनी दुष्काळी जिल्हा जाहीर करण्याची मागणी केली आहे़ दुष्काळ जाहीर करण्याचे काही निकष असतात़ सप्टेंबरपर्यंत पाऊस न पडल्यास याविषयी निर्णय घेतला जाईल़ सध्या पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे़ जिल्हत ४३ प्रादेशिक पाणी योजना आहेत़ त्यापैकी शहर टाकळी व घोसपुरी पाणी योजना सुरू करण्यात आली असून, उर्वरित योजना सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले़पाणी कपातीतून नगरकरांची सुटकाशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात नवीन पाण्याची आवक झाली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुळा धरणात दीड टीएमसी पाणी आले आहे़ त्यामुळे नगर शहराला येत्या आॅगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी मुळा धरणात आहे़ नवीन पाण्याची आवक झाल्याने नगरकरांची पाणी कपातून तुर्तास तरी सुटका झाली आहे़कुकडी व दारणातून पाणीदारणा धरणात नव्याने पाण्याची आवक झाली आहे़ त्यामुळे दारणा धरणातून पाण्याची मागणी करण्यात आली आहे़तर कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणातून पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जतसाठी पाण्याची मागणी करण्यात आली आहे़
भर पावसाळ्यात ३६९ टॅँकर
By admin | Updated: July 22, 2014 00:09 IST