शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मयताच्या खात्यातील ३० लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 18:31 IST

श्रीरामपूर : आयसीआयसीआय बँकेच्या श्रीरामपूर शाखेत मयताच्या खात्यातील ३० लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबत शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध ...

ठळक मुद्दे६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखलआयसीआयसीआय बँकेतील प्रकार शाखाधिका-यासह सहा अधिकारी आरोपी

श्रीरामपूर : आयसीआयसीआय बँकेच्या श्रीरामपूर शाखेत मयताच्या खात्यातील ३० लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबत शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आरोपींमध्ये शाखा व्यवस्थापकांसह बँकेतील अधिकारी, कर्मचा-यांचा समावेश आहे.अमृतलाल चावला यांच्या बँक खात्यात ३० लाख ४० हजार ७०० रुपये जमा होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रवीण यांनी बँकेकडे या रकमेची वारंवार मागणी करूनही त्यांना बँकेकडून रक्कम न मिळता उडवाउडवीची उत्तरे कर्मचा-यांकडून मिळाली. मयत अमृतलाल वृद्ध असल्यामुळे त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार लक्षात त्यांचा मुलगा प्रवीण याच्या लक्षात आला.  तो अमेरिकेत असल्याने त्याच्या सुचनेवरून त्यांचे नातेवाईक जितेश मोहन जनवेजा (रा. काझीबाबा रोड, सुभेदारवस्ती, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शाखा व्यवस्थापक सचिन बोंबले, अधिकारी विनायक मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रिया अय्यर, राजन व प्राची (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.  ‘अमृतलाल चावला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयसीआयसीआय बँक श्रीरामपूर शाखेतील खात्याविषयी चौकशी केली असता त्यांच्या खात्यातील जमा रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता जमा रकमेपैकी काही रक्कम सचिन बोंबले यांच्या आयसीआयसीआय बँकेतील वैयक्तिक खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत शाखाधिका-यांकडे चौकशी केली असता आम्हाला काही सांगता येणार नाही, असे उत्तर देण्यात आले. आरोपी रवी बनकर, विनायक मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रिया अय्यर, राजन, प्राची यांच्याकडून फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे सांगून पैसे देण्याबाबत अप्रामाणिकपणा दाखवून आपली फसवणूक केली. आरोपींनी इतर बँकेतील रकमाही आयसीआयसीआय बँकेत त्यांच्या खात्यात आणण्यास सांगितले. मयत अमृतलाल चावला हे वृद्ध असल्याचा फायदा घेऊन आरोपींनी वेळोवेळी फसवणूक केली आहे,’ असे फिर्यादीत म्हटले आहे. ही बाब त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रवीण यास जमा रक्कम न मिळाल्यामुळे फसवणूक व अपहार झाल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.