शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार जणांना शस्त्र बाळगण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केले असून ते निकालापर्यंत म्हणजे २३ मेपर्यंत लागू राहणार आहेत. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा जे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपद्रवी आहेत, अशा लोकांना आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत.जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर असे दोन लोकसभा मतदारसंघ असून येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकारान्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत. निवडणूक काळात शस्त्र बाळगणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण ३ हजार २६९ जणांकडे शस्त्र परवाना आहे. त्यात शिर्डी मतदारसंघात १२८२, तर अहमदनगर मतदारसंघात १९८७ जणांकडे शस्त्रे आहेत. शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांत गावठी कट्टे, पिस्तूल अशा शस्त्रांचा वापर झाला असून निवडणूक काळात तर या गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ही शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या परवानाधारकावर गंभीर गुन्हा दाखल आहे किंवा गंभीर गुन्ह्यातून ज्यांची नुकतीच जामिनावर सुटका झालेली आहे किंवा अशी राजकीय व्यक्ती ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा व्यक्तींना संबंधित पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. उर्वरित शस्त्रधारकांना निवडणूक काळात शस्त्रे जवळ बाळगण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर