शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार; कोपरगावात पुणे धर्मादाय आयुक्तांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:28 IST

पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली.

कोपरगाव : पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली.कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व लायन्स मुकबधीर विद्यालयास कचरे यांनी बुधवारी भेट दिली. ते म्हणाले, पुणे विभागातील अहमदनगर, पुणे, सोलापुर व सातारा या चारही जिल्ह्यांमध्ये २९ हजार निष्क्रीय संस्था आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील १० हजार संस्थांचा समावेश आहे. सर्व संस्थांचा मुळ अभिलेख तपासण्यात आला आहे. त्यात धर्मदाय कायद्यान्वये नोंदणी झाल्यापासून हिशोब पत्रके व विश्वस्त बदलाचे अर्ज सादर केलेली नाहीत. अशा संस्थांना नोटीसा देण्यात आल्या असुन चारही जिल्ह्यातील २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील १६७ संस्था निष्क्रीय करण्यात आल्याचे कचरे यांनी सांगितले. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे व विश्वस्त अशोक खांबेकर यांनी कचरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व सदस्य संदीप रोहमारे उपस्थित होते.

पुणे विभागातील निष्क्रीय संस्था

पुणे जिल्हा (१० हजार ५९), नगर जिल्हा (१० हजार ५००), सोलापूर जिल्हा (१ हजार १०६) व सातारा जिल्हा (७ हजार ५४४) अशा एकूण २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द होणार.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव