शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अकोेलेतील सोंगांच्या यात्रेत ३ लाख भाविकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:03 IST

संगणकाच्या युगात चिमुकले वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत. असे असतानाही लिंगदेव (ता. अकोले) येथे ‘सोंगांची आखाडी’, ‘बोहडा’ ही लोककला संस्कृती आजही जपली जात आहे.

अकोले : संगणकाच्या युगात चिमुकले वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत. असे असतानाही लिंगदेव (ता. अकोले) येथे ‘सोंगांची आखाडी’, ‘बोहडा’ ही लोककला संस्कृती आजही जपली जात आहे. गुढीपाडव्याला ‘लिंगेश्वराची’ सोंगांची यात्रा पुरोगामी विचाराची कास धरीत उत्साहात पार पडली. जवळपास तीन लाख भाविकांनी यात्रेला हजेरी लावली.दिवसरात्र देणगीच्या ओघामुळे यंदा गुढीपाडव्याला ९ लाख ५० हजार रुपये लिंगेश्वर संस्थानच्या तिजोरीत जमा झाले आहेत. भाऊसाहेब घोमल यांनी ३१ हजार रुपये तर अभियंता अमोल फापाळे यांनी २५ हजार रुपये अशी यंदाची सर्वाधिक देणगी दिली आहे. शनिवारी पहाटे लिंगेश्वर महादेवाची महापूजा, महाआरती झाल्यावर दर्शनासाठी मंदिरासमोर रांगा लागल्या. रात्रभर दर्शन रांग होती. ऋतुमान उकलविधी, शोभायात्रा व लेझीम स्पर्धा पार पडल्या.मकडी- डोरेमॉन, निंज्या -हातोडी ही नावे लहान मुलांच्या तोंडातील परवलीचे शब्द होत. त्यामुळे पौराणिक नावे कालबाह्य होताना दिसत आहेत.कथा, पुस्तक, ग्रंथापुरत्याच सीमित होत आहेत. अंगणात ओट्यावरती चांदण्याच्या प्रकाशात गोष्टी सांगणारे आणि ऐकणारे आता दिसत नाहीत. अशा काळात पुराण-इतिहासातील पात्रे जिवंत ठेवण्याचे काम आखाडी लोककलेतून केले जात आहे. आखाडी यात्रेत पुरोगामी विचारांची सांगड घालून डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पोलीस, सैन्यदलातील जवान आदींसह शेतात काबाडकष्ट करणारे असे उच्चशिक्षित व अल्पशिक्षित गावकरी अनादी कालापासून चालत आलेली परंपरा जोपासत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले